मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना रक्ताचा तुटवडा भासत आहे. या काळात महाराष्ट्र पोलीस खात्यातील 2008 च्या बॅचने एक अनोखा अपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये रक्तदानाचा निश्चय करत शेकडो पोलिसांनी रक्तदान केले. राज्यात काही दिवसांचा रक्तपुरवठा उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते, त्याला अनुसरून रक्त कमी पडू नये म्हणून या पोलिसांनी रक्तदान केले आहे.
2008 च्या बॅचमधील पोलिसांचा अनोखा उपक्रम, शेकडो पोलिसांनी केले रक्तदान
महाराष्ट्र पोलीस खात्यातील 2008 च्या बॅचने एक अनोखा अपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये रक्तदानाचा निश्चय करत शेकडो पोलिसांनी रक्तदान केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रक्ताचा तुटवडा असून, नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर पोलीस दलातून मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 2008 सालच्या या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बॅचने पोलीस दलात यशस्वी 11 वर्षे पूर्ण केली. मात्र, सध्याच्या घडीला रक्तदान करून आपन या संकटावर मात करायला हवी असा निश्चय या पोलिसांनी केल्यावर मुंबईतील नायगाव पोलीस संकुल या ठिकाणी शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात मुंबई, रायगड, ठाणे यासारख्या पोलीस विभागात कार्यरत असलेल्या शेकडो पोलिसांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन रक्तदान केले.