महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुझे आहे तुजपाशी! कोरोनाच्या संकटातून वाचण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी सांगितला मार्ग - कोरोनातून वाचण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी सांगितला मार्ग

कोरोनाचा संसर्ग टाणळ्यासाठी पंतप्रधान नेरेंद्र मोदींनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन वेळोवेळी नागरिकांना सुचना देत आहे. अशातच महाराष्ट्र पोलिसांनी एक ट्वीट करत कोरोनाच्या संकटातून वाचण्याचा मार्ग सांगितला आहे.

maharashtra police
कोरोनाच्या संकटातून वाचण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी सांगितला मार्ग

By

Published : Apr 19, 2020, 6:40 PM IST

मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा देशासह राज्यातही दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. विशेषत:मुंबई परिसर आणि पुण्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे. कोरोनाचा संसर्ग टाणळ्यासाठी पंतप्रधान नेरेंद्र मोदींनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन वेळोवेळी नागरिकांना सुचना देत आहे. अशातच महाराष्ट्र पोलिसांनी एक ट्वीट करत कोरोनाच्या संकटातून वाचण्याचा मार्ग सांगितला आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी ट्वीट करत तुझं आहे तुझपाशी असे म्हटले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी, त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी घरापेक्षा सुरक्षित जागा असूच शकत नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे सर्वांना घरी राहण्याचे आव्हान त्यांनी केले आहे. तसेच त्यांनी त्या ट्वीटबरोबर एक फोटोही शेअर केला आहे. त्यामुध्ये त्यांनी गुगलवर कोरोनापासून जगातील सर्वात सुरक्षीत स्थान असे टाकले आहे, तेव्हा तेथे घर असे सांगण्यात आले. असा फोटो त्यांनी शेअर केला आहे. एकंदरीतच या संकटाच्या काळात घरी राहण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details