मुंबई :महाराष्ट्र राज्य हे फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखले जाते. याचे कारण या महापुरुषांनी शिक्षणाचा बाजार मांडला ( Maharashtra Number of Girls in Science Increased ) नाही. शिक्षण संस्था राष्ट्राला अर्पण ( Girls Lead in Higher Education in Maharashtra ) केल्या. आपल्या ( Maharashtra Number of Girls in Science Increased ) मोठ्या विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणामध्ये मुलींची पटसंख्या वाढल्याचे आढळून आले आहे. त्यामुळेच सत्तर वर्षांमध्ये महाराष्ट्र शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एका उच्च पातळीवर पोहोचला आणि ही प्रगतशील घटना आहे. मात्र, तरीही तामिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांच्या तुलनेमध्ये आपल्याला बरीच मजल गाठायची आहे, असे दिसते.
महाराष्ट्रात उच्च शिक्षणामध्ये मुली अग्रेसर; सायन्स, अभियांत्रिकी, गणित अभ्यासक्रमात पटसंख्या वाढली कोरोना महामारीनंतर विद्यार्थिनींची पटसंख्या वाढली :कोरोना जागतिक महामारीमुळे शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि इतर संपूर्ण अर्थचक्र यावर परिणाम झाला. लाखो लोक बेरोजगार झाले, आता कुठे कोरोना महामारीमधून देश सावरत आहे. कोरोना महामारीचा फटका बसल्यामुळे उच्च शिक्षणामधील विज्ञान, अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि गणित या क्षेत्रांमधील पटसंख्या घसरली होती. दोन लाख वीस हजार या मुलींनी त्यावेळेला वरील अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. आता मात्र त्यामध्ये वाढ झाली आहे. लोकांकडे पैसा नसल्यामुळे राज्याच्या सरकारी शाळांमध्येदेखील लाखाने सरकारी शाळेची पटसंख्या वाढली. आता उच्च शिक्षणातदेखील ही पटसंख्या मुलींची वाढलेली आहे ही लक्षणीय बाब येथे नोंदवण्यात आली आहे.
देशातील 10 राज्यांमध्ये महाराष्ट्र सातव्या स्थानी :महाराष्ट्रातील उच्च शिक्षणात खासगी विनाअनुदानित शिक्षण संस्था अधिक असल्यामुळे शिक्षण महाग झाले आहे. त्यामुळेच युक्रेनसारख्या देशात हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण घ्यायला जातात. तरीदेखील या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थिनींची संख्या वाढत आहे, ही महत्त्वाची बाब आहे. 2020-2021 या वर्षी पटसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 4 लाख 84 हजार 763 तर त्या मागच्या वर्षी मुलींची पटसंख्या ही कमी होती. 2019-20 या वर्षी राज्यातील स्टीम या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थिनींची 4,82,407 तर 2018-19 यावर्षी विद्यार्थिनींची स्टीम या अभ्यासक्रमात संख्या 4,75,208 इतकी होती.
शासनाने खेड्यापाड्यातील मुलामुलींना दिले भरघोस अनुदान :त्या आधीच्या वर्षांमध्ये 2017-18 विद्यार्थिनींची पटसंख्या 4,75010 इतकी होती. तर पाच वर्षांपूर्वी विज्ञान अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि गणित या अभ्यासक्रमांसाठी 2016-17 यावर्षी पटसंख्या होती, 4,63,762 राजस्थान, तामिळनाडू, ओडिसा, गुजरात, बिहार, आंध्र प्रदेश आणि नंतर महाराष्ट्राचा क्रमांक तीन या अभ्यासक्रमामध्ये लागतो. याचा अर्थ देशामध्ये महाराष्ट्र राज्य प्रगतशील जरी आहे, तरी इतर राज्यांच्या तुलनेमध्ये उच्च शिक्षणात व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये पटसंख्या अजूनही थोडे मागे आहे. यासाठी शासनाने खेड्यापाड्यातील मुलामुलींना भरघोस अनुदान दिले पाहिजे.
व्यावसायिक अभ्यासक्रमात मुलींची संख्या वाढली : या संदर्भात उच्च शिक्षण घेणारी गायत्री मोगल ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या विद्यार्थी संघटनेच्या या विद्यार्थिनीने ई-टीव्हीसोबत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यात त्या म्हणतात की, "स्टीम अर्थात विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या अभ्यासक्रमात विद्यार्थिनींची संख्या वाढत आहे, ही आनंदाची बाब आहे. त्याबद्दल मलादेखील आनंद आहे. मात्र, ही वाढ झाली कारण शासनाच्या पुढाकारामुळे नाही; तर आपल्या महाराष्ट्रात जी समतेची परंपरा आहे. त्यामुळे मुलींमध्ये जागरूकता आहे. मात्र, अद्याप महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेमध्ये बराच पल्ला गाठणे बाकी आहे, याचीदेखील नोंद घ्यावी. ग्रामीण भागातील गरीब मुलींना बारावीपर्यंत आणि त्यापुढे शिक्षण घेणे कठीण जाते त्या ठिकाणी शासनाने विशेष मदत केली पाहिजे."
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची विद्यार्थिनी रूपाली परदेशी यांच्या मतानुसार :अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची विद्यार्थिनी रूपाली परदेशी या म्हणाल्या की, "कोरोना महामारीच्या काळानंतर चार लाख 80 हजारपेक्षा अधिक विद्यार्थिनी या व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये आहेत. सायन्स इंजीनिअरिंग टेक्नॉलॉजी मॅथेमॅटिक्स ही आनंदाची बाब आहे. मीदेखील उच्चशिक्षण घेत आहे. मी विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत आहे. आपल्या राज्यात मुलींचे प्रमाण वाढत आहे, ही आनंदाची बाब आहे. याला कारण आपल्या राज्यात प्रबोधन चांगल्यापैकी झालेले आहे. मात्र, तेवढ्यावर समाधान मानता कामा नये अजून ग्रामीण भागात मुलींच्या सुरक्षेसंदर्भात किंवा पालकांचा पारंपरिक दृष्टिकोन आहे. त्यामुळेदेखील मुलींना शिक्षण घेणे अवघड जाते, यावरदेखील शासनाने लक्ष द्यायला हवे."