मुंबई- "महाराष्ट्रामध्ये ८० हजार रेमडेसिवीरची गरज असून, महाराष्ट्राला अधिक आरोग्य सुविधा मिळाव्यात ही आमची मागणी आहे. महाराष्ट्रात कोरोना चाचणीची संख्या मोठी आहे. गुजरातमध्ये मोफत रेमडेसिवीर वाटप सुरू आहे. राजकीय पक्षाला रेमडेसिवीर कसे मिळते? हा गंभीर प्रश्न आहे. भाजप पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पैसा खर्च करत आहे. मग केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या जीएसटी थकबाकीचे पैसे अदा करावेत". सध्याच्या घडीला महाराष्ट्राला पैशांची जास्त गरज आहे असे राऊत यांनी म्हटले आहे.
'केंद्राने महाराष्ट्राच्या वाट्याचा पैसा तत्काळ द्यावा'
महाराष्ट्राची 80 हजार रेमडेसिवीरची गरज आहे. केंद्र महाराष्ट्राला लस कमी का देत आहेत? राज्यातील उच्च न्यायालयाला ऑक्सिजनबाबत हस्तक्षेप करायला लागतो, हे केंद्र सरकारने गांभीर्याने घेतले पाहिजे. केंद्र सरकार किती ऑक्सिजन प्लँट तयार करत आहेत हे सांगावे. देशभरात अनेक राज्यात टेस्ट होत नाही, त्यामुळे कोरोनाचा आकडा कमी आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कठोर निर्बंध लावले आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांचे संपूर्ण लॉकडाऊन करण्याची मागणी आहे. गुजरातमध्ये मोफत रेमडेसिवीर वाटप सुरू आहे. राजकीय पक्षाला रेमडेसिवीर कसे मिळते? हा गंभीर प्रश्न आहे. केंद्राने महाराष्ट्राच्या वाट्याचा पैसा तत्काळ द्यावा,असेही राऊत म्हणाले.
'महाराष्ट्राला पैशांची जास्त गरज आहे'