मुंबई -नशेखोरांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी भांडुप मनसे कार्यालय ते कांजूरमार्ग पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला. नशेखोरांचे अड्डे बंद करण्याची मागणी भांडुपकरांकडून कारण्यात आल्यानंतर मनसेचे उपविभाग अध्यक्ष अजय मिरेकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
भांडुपमध्ये नशेखोरांविरोधात मनसेचा मोर्चा हेही वाचा -विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्यात गृहमंत्र्यांचा पाहणी दौरा; साफसफाई करता कर्मचाऱ्यांची पळापळ
विक्रोळी, भांडुप गाव परिसरातील महाविद्यालयीन युवक मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी जात असून तरूण नशेच्या विळख्यात सापडले आहेत. या मोर्चा दरम्यान नशेखोरी विरोधात घोषणा देण्यात आल्या. 'अरे बघता काय सामील व्हा, ड्रग्सविरोधी चळवळीत सहभागी व्हा', 'ड्रग्स सोडा जीवन जोडा', 'व्यसने सोडा, आरोग्य घडवा', 'नशेचा राक्षस झालाय, तरुणांचा भक्षक', अशा घोषणा देत फलक हातात घेऊन सामान्य भांडूपकर मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चात भांडुपकर मोठ्या संख्यने उपस्थित होते.
हेही वाचा -मुलुंडमध्ये लष्कराचे युद्ध सामग्री प्रदर्शन, जवानांच्या चित्तथरारक कसरती
यावेळी मनसेच्या नेत्या रिटा गुप्ता म्हणाल्या, की नशेच्या विळख्यात आज तरुण पिढी मोठ्या प्रमाणात सापडत आहे . त्यांच्यावर आळा बसण्यासाठी मनसेकडून कांजूरमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद ओहोळ याना निवेदन आम्ही दिले आहे. आम्ही पोलिसांना 15 दिवसांचा अवधी देत आहोत. पोलिसांकडून जर योग्य ती कारवाई झाली नाही, तर मनसे स्टाईलने आंदोलन छेडले जाईलॉ, असा इशारा रिटा गुप्ता यांनी यावेळी दिला.