महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनसेचा गरजूंना आधार, सील परिसरांमध्ये अन्नधान्याचे वाटप - जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा

प्रभादेवी, दादर, माहिम येथील ज्या इमारती प्रशासनाने सीलबंद केल्या आहेत, त्यांच्या घरी मनसे नेते व माजी आमदार नितीन सरदेसाईंच्यामार्फत अन्नधान्य पोहोचवण्यात आले. सुमारे 10 ते 12 हजार किलोचे अन्नधान्य वितरीत करण्यात आले. यात गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळ, साखर, चहा पावडर व तेल इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.

मनसेचा गरजूंना आधार
मनसेचा गरजूंना आधार

By

Published : Apr 22, 2020, 10:48 AM IST

मुंबई- दादर, प्रभादेवी आणि माहिम परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळेल्या इमारती तसेच परिसर प्रतिबंधित करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांना घराबाहेर पडता येत नसल्याने जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू लागला आहे. या नागरिकांची गरज लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या नागरिकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

मनसेचा गरजूंना आधार

प्रभादेवी, दादर, माहिम येथील ज्या इमारती प्रशासनाने सीलबंद केल्या आहेत, त्यांच्या घरी मनसे नेते व माजी आमदार नितीन सरदेसाईंच्यामार्फत अन्नधान्य पोहोचवण्यात आले. सुमारे 10 ते 12 हजार किलोचे अन्नधान्य वितरीत करण्यात आले. यात गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळ, साखर, चहा पावडर व तेल इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांमार्फत आम्ही गरजू लोकांपर्यंत अन्नधान्य पोहोचवू शकलो याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details