मुंबई - सलूनमधील कर्मचाऱ्यांची उपासमार होत आहे, ती थांबवण्यासाठी सरकारने सलून व्यवसायास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ व सलून ब्युटी पार्लर असोसिएशनकडून करण्यात आली. या मागणीसाठी मुंबईतील विविध भागांमध्ये असलेल्या सलूनबाहेर हातात फलक घेत आज (बुधुवार) मूक निदर्शने करण्यात आली.
सलून सुरू करण्यास परवानगी द्या; व्यावसायिकांची सरकारविरोधात मूक निदर्शने - सलून व्यवसायीक न्यूज
सलूनमधील कर्मचाऱ्यांची उपासमार होत आहे, ती थांबवण्यासाठी सरकारने सलून व्यवसायास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नाभीक महामंडळ व सलून ब्युटी पार्लर असोसिएशनकडून करण्यात आली.
सलून व्यावसायिकांची सरकारविरोधात मुक निदर्शने
लॉकडाउनच्या काळात सलून व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या समस्या व अडचणींबाबत सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याविरोधात "माझे सलून माझा हक्क सरकार का गप्प" असा प्रश्न सरकारला विचारण्यात आला. महाराष्ट्र नाभीक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय अनारसे, सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचे उपाध्यक्ष तुषार चव्हाण यांच्यासह सलून दुकानांचे मालक व कर्मचारी या मूक निदर्शनात सहभागी झाले होते.