मुंबईमहाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व असा गोंधळ उडाला. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाला. यावेळी सभागृह सुरु होण्याआधी सत्ताधारी विरोधक आमनेसामने आले. विरोधकांची विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्याची जागा सत्ताधारी आमदारांनी काबीज केली आणि त्या नंंतर हो गोंधळ उडाला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Former Chief Minister Uddhav Thackeray तसेच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार NCP President Sharad Pawar यांच्यावर या आमदारांनी घोषणाबाजी करत निशाणा साधला.
ठाकरे यांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांचे उत्तर कालच शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली. शिंदे गटाच्या 50 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता सातत्याने आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांच्यावर टीका होत आहे. या टीकेला आज शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपच्या आमदारांसोबत विधान भवनाच्या पायऱ्यांवर बॅनरबाजी करून उत्तर दिले. यावेळी विविध प्रकारचे बॅनर झलकविण्यात आले होते.
उध्दव ठाकरेंवर टीकाकोविडच्या भीतीने राजा बसला घरी, हवालदिल जनता फिरली दारोदारी, युवराजांच्या चेल्यानी लुटली तिजोरी, भ्रष्टाचाराचे खोके पोहचले यांच्या घरी, अशी टीका विरोधकांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केली. आता पक्ष टिकवण्यासाठी फिरतात दारोदारलढणारे गद्दार, पक्ष संपवणार यांच्यासाठी मोठे खुद्दार, खुर्चीसाठी केले हिंदुत्व हद्दपार, खुर्चीत बसल्यावर शिवसैनिक केले वेशीपर, खुर्ची गेल्यावर आता फिरतात दारोदार अशा पद्धतीचे बॅनर झळकावून व नारेबाजी केली. आता शिंदे गटाच्या आमदारांनी भाजप आमदारांना सोबत शिवसेना व राष्ट्रवादीशी दोन हात करण्याचाच इशारा दिला आहे. भ्रष्टाचाराचे खोके, मातोश्री ओके अनिल देशमुख खोके सिल्व्हर ओक ओके, लावसाचे खोके सिल्व्हर ओक ओके, बेस्टचे खोके मातोश्री ओके, अशी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली.
मिटकरींचा आरोप विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकात बुधवारी सकाळी चांगलाच वाद रंगला. विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन करण्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मला मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांच्यावर केला. तर अशा लोकांवर कारवाई केली जावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ते म्हणाले, विरोधकांनी आमची जागा हायजॅक केली. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमदार अंगावर धावल्याचे चित्र होते.
अजित पवार म्हणालेपन्नास खोके एकदम ओक्के ही घोषणा सत्ताधारी आमदारांच्या फार जिव्हारी लागली. त्यामुळेच सत्ताधारी शिंदे गटातील आमदारांकडून आमच्या अंगावर धावून येण्याचा प्रकार घडला असा प्रकार लाजीरवाणा आहे. अशी प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रकारानंतर बोलताना दिली.