मुंबई:विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आजपासून सुरू होत आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना भरघोस निधीची तरतूद केली आहे. दुसरीकडे विरोधकांकडून निधी वाटप करण्यात आले नसल्याचा आरोप होत आहे. विधिमंडळात आज आमदारांना करण्यात येणाऱ्या निधीवाटपावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
Live Updates:
- अनेक आमदार सभागृहात मोबाईल फोनवर बोलत असतात. असे यापुढे आढळल्यास मोबाईल जप्त केले जातील, अशी ताकीद विधानपरिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात दिली आहे.
- ऑनलाईन जुगार संदर्भात जाहिराती करायच्या की नाही, हे त्यांनी ठरवावे. याबाबत भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा अभिमान वाटतो. त्यांनी जुगाराची अ एकही जाहिरात केली नाही.
- एक बजेट झाल्यानंतर लगेच दुसरा निधी बजेट ही नवी परंपरा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस आम्हाला आमच्याकडून फार अपेक्षा आहेत. अमोल मिटकरी, मनीषा कायंदे यांना निधी भेटायला हवाच, असा टोला ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी लगावला आहे.
- निधी वाटपात संदर्भात साधारणपणे आपल्याकडे प्रस्ताव आल्यावर विभाग ईपीसी तयार करते. याच्या आधारावर मान्यता असते. या सर्वात सर्वच मागण्या मंजूर होतात असे नाही. विरोधी पक्षांनी जो विषय मांडला आहे. त्यात मला इतिहासात जावे लागेल. मी ५ वर्ष मुख्यमंत्री असताना अशी कुठलीच चर्चा झाली नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्षात एक फुटकी कवडी भेटली नाही. कोविड हे फक्त विरोधी पक्षासाठी होते. तुम्ही गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारणार नाही. विरोधी पक्षनेते आज आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. ते तेव्हा शिकवायला पाहिजे होते. मेरिट आधारावर कामांवर आणलेली स्थगिती उठवली गेली आहे. आमच्याबरोबर राष्ट्रवादीचे जे आमदार आले नाही त्यांनाही निधी दिला गेला आहे. हा निधी कमी जास्त असू शकतो. विधान परिषदेच्या आमदार निधीबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
- उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिल्यानंतर अखेर रोहित पवार यांनी आंदोलन मागे घेतले आहे.
- गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांची भेट घेत चर्चा केली आहे. एमआयडीसी संदर्भात आश्वासन देऊनही अंमलबजावणी झाली नसल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
- शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत सरकारची मानसिकता दिसत नाही, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नसून अजून अवकाळी पावसाची मदत करण्यात आली नसल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यावर गिरीश महाजन यांनी मदत वाटपाबाबत राज्य सरकार गंभीर असल्याचे सांगितले.
- एमआयडीसी अधिसूचना जारी करेपर्यंत माघार घेणार नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. दुसरीकडे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी सुरू आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांनी टाळ वाजवून आंदोलन केले.
- कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी आंदोलन केले आहे. कर्जत जामखेड एमआयडीसीची प्रश्न सोडवावा, अशी त्यांनी मागणी केली आहे. आमदार पवार यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले आहे.
आमदार रोहित पवार यांनी आपले उपोषण मागे घ्यावे. शिवरायांच्या पुतळ्यासमोर आंदोलन न करता सभागृहात बोलावे. सभागृहाच्या पायऱ्यांवर उपोषण करणे योग्य नाही-राहुल नार्वेकर