मुंबई- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आज विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदारांना असमान वाटप, वारकऱ्यांवरील अन्याय या मुद्द्यांवरून आंदोलन केले आहे.
Live updates-
- सरकारकडून शासन आपल्या दारीची फक्त जाहिरातबाजी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांकरिता जनता हे कुटुंब असते. त्यांनी भेदभाव करणे योग्य नसल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
- राज्यातील पूर परिस्थितीवरर राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. अतिवृष्टी, पूरग्रस्तांना मदत देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
गुरुवारी विधिमंडळाच्या अधिवेशनात काय घडले?
- गेल्या महिन्यात मुंबईत चालत्या लोकल ट्रेनमध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार झाला. तेव्हा महिलांच्या डब्यात एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत महिलांच्या डब्यात पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असते. इतर वेळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोलीस तैनात असतात, असे फडणवीस यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात माहिती दिली आहे. कोणत्याही पोलिस कर्मचार्यावर कारवाई करण्यात आलेली नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.
- लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील 26 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या लिपिकाची जिल्ह्यातील औसा तहसीलमध्ये बदली करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत दिली आहे. लातूर तहसीलदारांच्या बँक खात्यातून 25.91 कोटी रुपयांच्या सरकारी निधीच्या गैरव्यवहारात लिपिकासह इतर तिघे सामील होते, असे विखे पाटील यांनी सांगितले. भाजप आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रश्नावरून विखे पाटील यांनी माहिती दिली. ही बँक खाती जलयुक्त शिवार अभियान योजनेतील आहेत.
- सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या हँडलमागे असलेल्यांची ओळख पटवण्यासाठी पोलीस ट्विटर इंडियाच्या संपर्कात असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली आहे.
- काँग्रेसच्या आमदार आणि माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी विधानसभेच्या अभ्यागतांच्या गॅलरीत मुलांच्या उपस्थितीवर आक्षेप नोंदविला. रेड अलर्टमुळे शाळा बंद असताना विधानसभेत गणवेशातील मुले कशी आली, असा प्रश्न गायकडवाड यांनी दिला आहे. मुले सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचतील याची सरकारने खात्री केली पाहिजे, अशी आमदार वर्षा गायकवाड यांनी मागणी केली.
हेही वाचा-
- Maharashtra Monsoon Session 2023: उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसावरून विधानपरिषदेत खडाजंगी, उपसभापती नीलम गोऱ्हेंविरोधात अनिल परब का भडकले?
- Balasaheb Thorat On Savitribai Phule : सावित्रीबाईंचा अपमान करणाऱ्यांबाबत सरकारची भूमिका संशयास्पद; विरोधकांचा सभात्याग