महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jitendra Awhad On Sharad Pawar: शरद पवार आपली भूमिका कृतीतून दाखवतात, त्यांच्या भूमिकेवर शंका घेण्याचे कारण नाही- जितेंद्र आव्हाड

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपली भूमिका कृतीतून दाखवतात, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.

Jitendra Awhad ON Sharad Pawar
जितेंद्र आव्हाड

By

Published : Jul 18, 2023, 2:26 PM IST

जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

मुंबई :राज्यात सध्या सुरु असलेल्या सत्ताकारणावरून जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला लक्ष केले. आतापर्यंत विरोधीपक्ष पक्ष एकत्र जमायचे आणि जनभावनेचा सन्मान करायचे. मात्र आत फक्त राजकारण सुरु आहे. अशा राजकारणाला जनता वैतागलेली आहे.केंद्रातील भाजपा विरोधातील विरोधकांची बैठक दोन दिवसीय बैठक बंगळुरू येथे आयोजित करण्यात आली आहे. बैठकीच्या पहिल्या दिवशी शरद पवार गेले नसल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवरती शंका उपस्थित करत होते. मात्र शरद पवार यांनी आपली भूमिका कृतीतून दाखवली. विरोधी पक्षाच्या बैठकीला गेले. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे, असे मला वाटत नाही. प्रत्येक गोष्टी तोंडाने बोलायची नसते, असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.


शरद पवारांच्या भूमिकेवर शंका नाही : ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांचा असून प्रदेशाध्यक्ष हे जयंत पाटील आहेत. अजित पवार गट शरद पवारांची मनधरणी करण्यासाठी येतो की काय, याबाबतची माहिती मला नाही, असे स्पष्ट मत जितेंद्र आव्हाड यांनी बोलून दाखवले आहे. त्यामुळे शरद पवारांच्या भूमिकेवर शंका घेण्याचे कारण नाही. भविष्यात अजित पवार गट पुन्हा ओरिजनल शरद पवारांसोबत येईल की नाही, याबाबत मी सांगू शकत नाही. कारण की मी पत्रिका बघत नाही, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.



खासगी आयुष्य देखील असते :भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमैय्या यांच्या संदर्भात कथित व्हायरल व्हिडिओ संदर्भात प्रश्नाला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी कोणाच्या खाजगी आयुष्यावर बोलणार नाही. सार्वजनिक आयुष्यासोबत खासगी आयुष्य देखील असते. बारसु रिफायनरी विरोधात आझाद मैदानात जे बसले आहेत, त्यांना आमचे समर्थन आहे. तो प्रकल्प झाला तर कोकणाची सुंदरता नष्ट करेल, असा दावा देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

हेही वाचा :

  1. Maharashtra Monsoon Session 2023: किरीट सोमैय्या यांच्यासारखे दलाल महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार करतात-अंबादास दानवे
  2. NDA Meeting in Delhi : देशातील 26 विरोधी पक्षाचा एनडीएच्या 38 पक्षांसोबत 'सामना', एनडीएची दिल्लीत आज बैठक
  3. Reaction on Kirit Somaiya Viral Video: किरीट सोमैय्या यांना जोड्याने मारू, महिलांचे शोषण करणे हीच का भाजपची संस्कृती- कॉंग्रेस नेत्या आक्रमक

ABOUT THE AUTHOR

...view details