मुंबई: विधानपरिषदेत कायदा व सुव्यवस्थेवर विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. बेपत्ता महिलांचा छडा लावण्यात सुधारणा झाल्या आहेत. राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे बोलणे चुकीचे आहे, असे गृहमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
Live updates-
- अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधी पक्षनेते बोलत असताना मुख्यमंत्री आणि एकही उपमुख्यमंत्री सभागृहात उपस्थित नसल्यामुळे विरोधक आक्रमक झाले. नाना पाटोले यांनी आक्षेप घेऊन सभागृह तहकूब करून त्यांना बोलवा अशी मागणी केली. सभागृहात ४ मंत्री उपस्थित आहेत, असे धनंजय मुंडे म्हणाले. धनंजय मुंडे, संजय राठोड, अदिती तटकरे आणि मंगलप्रभात लोढा उपस्थित आहेत. त्यामुळे कामकाज सुरू ठेवावे असं अतुल भातखळकर म्हणाले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निरोप दिला आहे, असं सांगितल्यावर कामकाज सुरू झाले.
- सरकार कुठल्याही परिस्थितीत खासगीकरणाला प्राधान्य देणार नाही. सर्व पदे भरली जाणार आहेत. लव्ह जिहाद किंवा मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न करणे, या संदर्भात वेगवेगळ्या राज्याने जे काही कायदे केले आहेत, त्याचा आपण अभ्यास करत आहोत. त्यामध्ये जे काही सर्वोत्तम असेल, उपयुक्त असेल त्या पद्धतीने आपण निर्णय घेऊ.
- नितीन देसाई यांचा स्टुडिओ हा मराठी माणसाचा स्टुडिओ आहे. तो वाचवण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करणार आहोत. पण काही न्यायालयीन प्रक्रिया आहेत, असे गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
- आळंदीमध्ये लाठीचार्ज झाला नाही. पोलिसांनी संपूर्ण घटनेचे चित्रीकरण केले आहे. चुकीच्या बातम्या दाखविण्यात आल्या आहेत. व्हिडिओ एडिट करून व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आहे. औरंगजेबाचा वाद एकाच वेळी विविध जिल्ह्यांमध्ये हा योगायोग नाही. अचानक औरंगजेबाचे स्टेट्स कुठून येतात? असा प्रश्न गृहमंत्र्यांनी उपस्थित केला आहे.
राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. औरंगजेब हा भारतीय मुस्लिमांचा हिरो होऊ शकत नाही. औरंगजेबाचे उद्दातीकरण कदापी सहन करणार नाही-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस