महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Breaking News Live : नवी मुंबईतील तुर्भे डम्पिंग यार्डला भीषण आग - tomorrow maharashtra news

Maharashtra breaking News
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

By

Published : Feb 3, 2023, 7:15 AM IST

Updated : Feb 3, 2023, 9:49 PM IST

21:47 February 03

नांदेडमध्ये जुन्या वादातून सराफा व्यापाऱ्यावर गोळीबार

नांदेड-जुन्या वादातून जुना मोंढा भागातील शारदा टॉकीज रस्त्यावर एका सराफा व्यापाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. सराफा व्यापारी जखमी झाला असून पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यास अटक केली आहे शारदा टॉकीजसमोर पाठक गल्ली भागातील सराफा व्यापारी सचिन पंढरीनाथ कुलथे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. आरोपी गजानन बालाजी मामीडवार याने दुचाकीवर येऊन ही फायरिंग केली. यात सचिन कुलथे याच्या हाताला जबर दुखापत झाली आहे.

21:24 February 03

नवी मुंबईतील तुर्भे डम्पिंग यार्डला भीषण आग

नवी मुंबई - तुर्भे डम्पिंग यार्डला भीषण आग लागली आहे. सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे काम सध्या सुरू आहे.

20:12 February 03

भारत राष्ट्र समिती यापुढे महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढवणार

औरंगाबाद - तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली तेलंगाणाने नऊ वर्षात केलेली प्रगती दाखवून भारत राष्ट्र समिती यापुढे महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढवेल, असे विधान तेलंगाणाचे मंत्री इंद्रकरण रेड्डी यांनी शुक्रवारी केले. तेलंगाणाचे वन आणि पर्यावरण मंत्री इंद्रकरण रेड्डी म्हणाले की, सीएम चंद्रशेखर राव हे ५ फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये सभेला संबोधित करणार आहेत.

18:31 February 03

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा उमेदवार महाविकास आघाडी उद्या जाहीर करणार

मुंबई : कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र, कोणत्याही पक्षाने उमेदवार जाहीर केला नाही. तत्पूर्वी आज महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडीकडून कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबतचा निर्णय उद्या जाहीर केला जाईल, असे सांगण्यात आले आहे.

18:27 February 03

भाजपने आम्हाला विश्वासात घेतले नाही म्हणून हा पराभव; शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा गोप्यस्फोट

बुलढाणा -अमरावती पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी झाले. यानंतर बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली. आम्हाला कोणत्याही प्रकारे या प्रचारात समाविष्ट न केल्याने. तसेच अँटी इन्कमबन्सी, जुनी पेन्शन या सर्व बाबींमुळे हा पराभव झाला असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीमध्ये नियोजनाचा अभाव असल्याचेही ते म्हणाले.

18:16 February 03

साहित्य संमेलनात मुख्यमंत्री यांच्या भाषणादरम्यान घोषणा देणाऱ्या 18 लोकांवर गुन्हे दाखल

वर्धा - मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री यांच्या भाषणादरम्यान घोषणा देणाऱ्या 18 लोकांवर गुन्हे दाखल. वर्धेच्या रामनगर पोलिसांत करण्यात आला आहे गुन्हा दाखल. मुख्यमंत्री यांच्या भाषणादरम्यान वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी केली होती घोषणाबाजी. रामनगर पोलिसांत आंदोलकानवर कलम 188 आयपीसी आणि 135 मुबंई पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल.

18:10 February 03

मुंबई एनसीबीची मोठी कारवाई; करोडो रुपयांचे ड्र्ग जप्त, एकाला अटक

मुंबई - एनसीबीने 2 फेब्रुवारी रोजी मुंबईतून इतर भागात ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या सिंडिकेटवर कारवाई केली होती. यात 1,32,000 अल्प्राझोलम गोळ्या आणि 2,400 CBCS बाटल्या जप्त केल्या होत्या. याप्रकरणी डोंबिवलीस्थित एस. यादवला एनसीबीने अटक केली आहे.

17:04 February 03

आसाममध्ये बालविवाहात गुंतलेल्या ५२ पुरोहित आणि काझींना अटक

आसाममध्ये बालविवाहात गुंतलेल्या ५२ पुरोहित आणि काझींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. धुबरी, बारपेटा, कोक्राझार, विश्वनाथ जिल्ह्यातून सर्वाधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. डीजीपी जीपी सिंह यांनी ही माहिती दिली आहे.

16:57 February 03

10 लाख रुपयांची बनावट नाणी जप्त

मुंबई - दिल्ली पोलिस आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 10 लाख रुपयांची बनावट नाणी जप्त करण्यात आली आहेत. आरोपीला कारसह अटक करण्यात आली आहे. धार्मिक स्थळांवर खोट्या नाण्यांच्या बदल्यात खऱ्या पैशाचा खेळ सुरू असल्याचे दिसून आले आहे.

16:28 February 03

जम्मू काश्मीरमध्ये मोठी कारवाई, जैश ए मोहम्मदच्या सहा जणांना अटक

कुलगाम - जम्मू काश्मीर सुरक्षा दलांनी सहा जणांना अटक केली आहे. हे सहाजण जैश-ए-मोहम्मद चे कार्यकर्ते आहेत. यामुळे मोठ्या घातपाताचा पर्दाफाश केला आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.

16:18 February 03

१९ वर्षीय विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी चुनाभट्टी येथून दोन फरार आरोपींना अटक

मुंबई - चुनाभट्टी परिसरात १९ वर्षीय विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने दोन फरार आरोपींना अटक केली आहे.

16:17 February 03

स्त्रीला जर वाकडे नजरेने पाहिले तर त्याचा संपूर्ण नाश होईल - पंकजा मुंडे

बीड - परळी वैद्यनाथ शहरातील आयोध्यानगर येथे लोकसहभागातुन बांधण्यात आलेल्या प्रभु श्री राम मंदिराच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहन सोहळा आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. स्त्रीला जर वाकडे नजरेने पाहिले तर त्याचा संपूर्ण नाश होईल, असे विधान पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

15:59 February 03

भ्रष्टाचार प्रकरणी अनिल देशमुख यांचा सहकारी कुंदन शिंदेला जामीन मंजूर

मुंबई - भ्रष्टाचाराच्या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे यांना विशेष न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला आहे.

15:59 February 03

सरकारी शाळेसाठी सॅनिटरी नॅपकिन्सची निविदा थांबवण्यास नकार; मुलींची सुरक्षा आणि स्वच्छता महत्त्वाची - मुंबई उच्च न्यायालय

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्र सरकारच्या सरकारी शाळांमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्याच्या निविदेतील काही अटींवर आक्षेप घेणारी याचिका फेटाळून लावली. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि स्वच्छता महत्त्वाची असल्याचे यावेळी न्यायालयाने नमूद केले आहे.

15:43 February 03

गंगापूरमध्ये तलवार बाळगणाऱ्या दोघांना दोन तलवारसह अटक, तिघाविरोधात गुन्हा दाखल

गंगापूर शहरात राहणाऱ्या दोघांना घरात तलवार बाळगल्याप्रकरणी गुरुवारी सायंकाळी सहा वाजेदरम्यान गंगापूर पोलिसांनी कारवाई करत दोन ठिकाणाहून दोघांना ताब्यात घेत दोन तलवारी जप्त करत दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी तलवार विकणाऱ्यासह तिघा विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून.संतोष माणिकराव खेडकर ,व सुभाष भाऊराव साळुंखे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची नावे आहेत.यातील तलवार विक्री करणारा एक फरार असलेल्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

15:43 February 03

उत्पादन शुल्क मंत्र्यांच्याच जिल्ह्यात अवैध दारू विक्री, दारू अड्डा उध्दवस्त करून महिलांनी विक्रेत्याला चोपले

सातारा - राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातार्‍याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा जिल्ह्यात बेकायदेशीर दारूची खुलेआम विक्री होत असल्याचा प्रकार एका घटनेतून समोर आला आहे. भाडळे गावातील मध्यवर्ती चौकात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू अड्ड्यावर चिलेवाडी (ता. कोरेगाव) येथील महिलांनी हल्लाबोल करत संपूर्ण दारूअड्डा उध्दवस्त केला. पत्र्याच्या शेडमध्ये राजरोस दारूविक्री करणार्‍या विक्रेत्याला महिलांनी चोप देत दारूच्या बाटल्या फोडून टाकल्या. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

14:51 February 03

वेगळ्या विदर्भासाठी साहित्य संमेलनात दोघांची मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी

वर्धा - साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात विदर्भ राज्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर दोन जणांनी घोषणाबाजी केली.

14:47 February 03

खासदार संजय राऊत यांच्या जामीनाला आव्हान, सुनावणी सुरू

मुंबई - ईडीने खासदार संजय राऊत यांच्या जामीनाला आव्हान दिले आहे. जामीन रद्द करण्याबाबत आज सुनावणी होत आहे.

14:13 February 03

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे अखेर विजयी

अमरावती - विधान परिषद निवडणुकीत धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. या निवडणुकीची मतमोजणी तब्बल 30 तास सुरू होती.

13:31 February 03

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना जय विदर्भाच्या घोषणा, आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

साहित्य संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना जय विदर्भच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. वेगळ्या विदर्भाचे पत्रक फेकून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

13:10 February 03

हैदराबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा १२५ फूट उंचीचा उभारण्यात येणार पुतळा

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बी. आर. आंबेडकर यांच्या नावाने नवीन सचिवालयाचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी सरकारचे अभिनंदन करतो. नवीन सचिवालयाच्या बाजूला आंबेडकरांचा १२५ फूट उंच पुतळा बसवला जात आहे हे कळवताना मला आनंद होत आहे, असे तेलंगणाच्या राज्यपालांनी म्हटले आहे.

13:09 February 03

लोकसभा खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी काँग्रेसकडून व्हिप जारी

काँग्रेसने आज आपल्या लोकसभा खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे. सर्व विरोधी पक्षांना एकजुटीने या अत्यंत अयोग्य मुद्द्यावर चर्चा हवी आहे. चीन, बेरोजगारी आणि महागाई या मुद्द्यांवर सरकार चर्चा करू इच्छित नाही. सरकारला लाजवेल असा कोणताही मुद्दा, त्यांना त्यावर चर्चा करायची नाही, अशी टीका काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केली.

12:43 February 03

बीबीसी डॉक्युमेंटरी सेन्सॉर करण्यापासून केंद्र सरकारला रोखा, याचिकेवर सरकारला नोटीस

नवी दिल्ली - गुजरातमधील 2002 च्या दंगलीशी संबंधित बीबीसी डॉक्युमेंटरी सेन्सॉर करण्यापासून केंद्र सरकारला रोखण्याचे निर्देश देण्याची मागणी सुप्रीम कोर्टात केली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्राकडून तीन आठवड्यांत उत्तर मागितले आहे. सुप्रीम कोर्टाने प्रकरणाची सुनावणी एप्रिलमध्ये ठेवली आहे.

12:04 February 03

वाई तालुक्यात तरूणाची प्रेम प्रकरणातून हत्या, पोलीस बंदोबस्तात वाढ

सातारा - वाई तालुक्यातील परखंदी गावच्या शिवारात ३० वर्षाच्या तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे. अभिषेक जाधव, असे मृत तरूणाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, वाईच्या डीवायएसपी डॉ. शीतल जानवे-खराडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे वाई तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून तरूणाचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेमुळे तरूणाच्या खानापूर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

12:01 February 03

मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा मेल; एनआयए, पोलिसांची संयुक्त चौकशी सुरू

मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेला एका अज्ञात व्यक्तीकडून एक मेल मिळाला आहे. त्यामध्ये तालिबानी सदस्य असल्याचा दावा केला आहे. मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याची धमकी मेलमध्ये दिली आहे. पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली. एनआयएने मुंबई पोलिसांना या घडामोडीची माहिती दिली. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध शहरांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

11:49 February 03

राज्यसभा व लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थिगत

अदानीच्या यांच्या मुद्द्यावरून संसदेमध्ये गोंधळ झाला. राज्यसभा व लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थिगत करण्यात आले आहे.

11:33 February 03

तलवार बाळगणाऱ्या दोघांना अटक, दोन तलवार जप्त,तिघाविरोधात गुन्हा दाखल

औरंगाबाद - गंगापूर शहरात राहणाऱ्या दोघांना घरात तलवार बाळगल्याप्रकरणी गुरुवारी सायंकाळी अटक केली. पोलिसांनी कारवाई करत दोन तलवारीही जप्त केल्या. याप्रकरणी तलवार विकणाऱ्यासह तिघा विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

10:54 February 03

शिंदे गटातील नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीची आत्महत्या

बाळासाहेबांची शिवसेना माथाडी जिल्हाध्यक्ष निलेश माझीरे यांच्या बायकोने विष पिऊन आत्महत्या केली आहे. बुधवारी विष प्राशन केल्यानंतर गुरुवारी रात्री रुग्णालयात मृत्यू झाला. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. माझिरे हे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची मनसेमधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेन मध्ये प्रवेश केला होता

10:03 February 03

मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा एनआयएला ई-मेल

मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा एनआयएला ई-मेल आला आहे. देशातील विविध शहरांना एनआयएकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. ई-मेल करणाऱ्याचा तालिबानी असल्याचा दावा एनआयएनएने मुंबई पोलिसांना माहिती दिली आहे.

09:54 February 03

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सर्व खासदारांना देणार अर्थसंकल्पाची माहिती

केंद्रीय मंत्री पियुष गोयल, किरेन रिजिजू आणि भाजप खासदार सुकांता मजुमदार आणि सुशील मोदी संसदेत पोहोचले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सर्व भाजप खासदारांना अर्थसंकल्पाची माहिती देणार आहेत. राज्यसभा आणि लोकसभेतील सर्व खासदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

09:53 February 03

अबुधाबीहून कोलकात्याला जाणाऱ्या विमानाच्या इंजिनला आग, विमान सुरक्षितपणे उतरले

अबुधाबीहून कोलकात्याला जाणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान एका इंजिनमध्ये आग दिसल्यानंतर अबुधाबी विमानतळावर परत आले. विमान सुरक्षितपणे उतरले आणि सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे एअर इंडिया एक्सप्रेसने म्हटले आहे.

09:42 February 03

नारायण राणे यांचे दावे हास्यास्पद, पाठविली मानहानीची नोटीस- संजय राऊत

खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठविली आहे. हा खटला पैशासाठी नसल्याचेही खासदार राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

09:12 February 03

हैदराबादमध्ये सचिवालयाच्या इमारतीला आग

हैदराबादमध्ये आज पहाटे बांधकाम सुरू असलेल्या सचिवालयाच्या इमारतीला आग लागली. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे हैदराबाद पोलिसांनी सांगितले.

09:11 February 03

अमलूचे दूध महागले!

अमूलने अमूल पाऊच दुधाच्या (सर्व प्रकार) किमती प्रति लिटर ३ रुपयांनी वाढवल्या आहेत. ही माहिती गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने दिली आहे.

09:08 February 03

तेलंगणा विधानसभेचे अधिवेशन आजपासून सुरू होणार

तेलंगणा विधानसभेचे अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन यांचे आज विधानसभेत औपचारिक भाषण होणार आहे आणि अर्थसंकल्प 6 फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता आहे.

08:58 February 03

प्रथा-परंपरेनुसार ग्रंथ दिंडीने ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला सुरूवात

विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे होत असलेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरूवात ग्रंथ दिंडीने करण्यात आली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मावळते अध्यक्ष ज्‍येष्‍ठ साहित्यिक भारत सासणे, यंदाच्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्‍यक्ष ज्‍येष्‍ठ साहित्यिक न्‍या. नरेंद्र चपळगावकर यांच्यासह शेकडो साहित्यिक आणि साहित्य रसिक उपस्थित होते.

08:13 February 03

रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांची आज दहा वाजता बैठक

राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सभागृहाच्या कामकाजाची रणनीती ठरवण्यासाठी सकाळी १० वाजता त्यांच्या संसदीय कार्यालयात विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.

08:10 February 03

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ४ फेब्रुवारीला होणार सादर

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 4 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे, 1985 नंतर प्रथमच नगरसेवकांचा कार्यकाळ संपत असताना प्रशासनाकडून अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

07:32 February 03

अमरावतीत दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरू, काँग्रेस-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने

अमरावतीत दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरू आहे. ४७ हजार १०१ मतांचा कोटा निश्चित आहे. काँग्रेस-भाजपचे कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर आमने-सामने आल्याचे दिसून आले.

07:28 February 03

तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक काशिनाथुनी विश्वनाथ यांचे निधन

तेलगू चित्रपटसृष्टीत एक मोठी शोकांतिका घडली आहे. अनेक अप्रतिम चित्रपट देणारे आणि कलातपस्वी म्हणून ओळखले जाणारे दिग्गज दिग्दर्शक काशिनाथुनी विश्वनाथ (९२) यांचे निधन झाले. वृद्धापकाळाने त्रस्त झाल्याने गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती गंभीर झाली. कुटुंबीयांनी त्याला ज्युबली हिल्स येथील अपोलो रुग्णालयात नेले जेथे डॉक्टरांनी त्याचा आधीच मृत्यू झाल्याची पुष्टी केली. 5 दशके तेलुगू चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडणाऱ्या विश्वनाथ यांनी चित्रपटसृष्टीला शोकसागरात सोडले.

06:36 February 03

Maharashtra breaking News : ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दोन कोटीचा निधी मंजूर

मुंबई :अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारने दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मराठी साहित्य महामंडळाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी २३ ऑगस्ट २०१८ च्या शासन निर्णयानुसार ५० लाख इतके एकरकमी अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले होते. य


Last Updated : Feb 3, 2023, 9:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details