महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Molestation Case: महिला अधिकाऱ्याचा मंत्रालयातच विनयभंग.. मंत्र्यानी दिले चौकशीचे आदेश - भाजप उपनेत्या चित्रा वाघ

मंत्रालयात इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विभागामध्ये अवर सचिव स्तरावर असणाऱ्या एका अधिकाऱ्याने याच विभागात उपसंचालक दर्जाच्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग (Maharashtra Ministry Women employee molestation) केल्याचा प्रकार घडला आहे. भाजप उपनेत्या चित्रा वाघ (BJP deputy leader Chitra Wagh) यांनी या प्रकरणी या खात्याचे मंत्री अतुल सावे यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर कारवाई (legal action on Ministry female employee molestation case) करण्याची मागणी केली आहे.

Ministry Female Employee Molestation
Ministry Female Employee Molestation

By

Published : Oct 30, 2022, 3:37 PM IST

मुंबई :मंत्रालयात इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विभागामध्ये अवर सचिव स्तरावर असणाऱ्या एका अधिकाऱ्याने याच विभागात उपसंचालक दर्जाच्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग (Maharashtra Ministry Women employee molestation) केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणानंतर सर्व ठिकाणी संताप (outrage over female employee molestation in the ministry) व्यक्त केला जात असताना भाजप उपनेत्या चित्रा वाघ (BJP deputy leader Chitra Wagh) यांनी या प्रकरणी या खात्याचे मंत्री अतुल सावे यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर कारवाई (legal action on Ministry female employee molestation case) करण्याची मागणी केली आहे. (Chitra wagh on Female employee molestation)

काय म्हणाल्या चित्रा वाघ?याबाबत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, मंत्रालयातील एक वरिष्ठ महिला अधिकारीशी त्याच विभागातल्या एका वरिष्ठ पुरुष अधिकाऱ्याने विनयभंग केल्याची अत्यंत संतापजनक व निंदनीय घटना घडली आहे. संबंधित महिला अधिकारीशी माझे बोलणे झाले आहे. त्यांनी त्यांचा तक्रारीचा अर्ज जो शासनाकडे पाठविला आहे त्याची एक प्रत माझ्याकडे पाठवली आहे. या तक्रारी बाबत या खात्याचे मंत्री अतुल सावे यांच्याशी बोलणे झाल्यानंतर त्या अधिकाऱ्याची तात्काळ चौकशी करत त्याला निलंबित करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. येणाऱ्या एक-दोन दिवसात ही चौकशी पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. त्यात काही तथ्य आढळल्यास त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. हे शिंदे फडणवीस यांचे सरकार आहे. मुलींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांवर, त्यांची छेड काढणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही. असेही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्याच्या विनयभंग प्रकरणी बोलताना चित्रा वाघ


निलम गोऱ्हे यांनीही केली आहे मागणी :मंत्रालयात इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विभागामध्ये अवर सचिव स्तरावर असणाऱ्या एका अधिकाऱ्याने याच विभागात उपसंचालक दर्जाच्या महिला भगिनीला अधिकारी म्हणून गेलेल्या असताना, त्यांना 'मला बरे वाटत नाही मी बोअर झालो आहे. मला जरा गाणे म्हणून दाखव' अशा प्रकारचं अत्यंत स्वरूपाची भूमिका पुरुष अधिकाऱ्याने घेतली. अशा पद्धतीचे हीन वक्तव्य एका मंत्र्यांच्या अवर सचिवानी केलं आहे. त्याच ठिकाणी याच विभागाचे उपसचिव देखील उपस्थित होते. त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details