महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'गुरुवारी संध्याकाळपर्यंत खातेवाटप होणार, अफवांवर विश्वास ठेवू नका' -

खातेवाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, उद्या (गुरुवार) संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच कोण-कोणत्या नेत्याला पालकमंत्रीपदाची जबाबदारी देणार याचीही चर्चा या बैठकीत झाली.

Ajit Pawar
उद्या संध्याकाळपर्यंत खातेवाटप होणार - अजित पवार

By

Published : Jan 1, 2020, 9:00 PM IST

Updated : Jan 1, 2020, 9:14 PM IST

मुंबई - खातेवाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, उद्या (गुरुवार) संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच कोण-कोणत्या नेत्याला पालकमंत्रीपदाची जबाबदारी देणार याचीही चर्चा या बैठकीत झाली. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असून, अफवांवर विश्वास ठेवू नका असेही अजित पवार म्हणाले.

तुटेपर्यंत ताणायचे नसते

कोणत्या मंत्र्यांला कोणते खाते मिळणार, हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. आज खातेवाटपाबाबत झालेली चर्चा ही सकारात्मक झाली असून, ती पूर्ण झाली आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत कोणाला कोणते खाते मिळणार हे स्पष्ट होण्यास काही अडचण नसणार असल्याचे अजित पवार म्हणाले. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष समाधानी आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, तुटेपर्यंत ताणायचे नसते. त्यामुळे खातेवाटपाबात कोणतीही अडचण नसल्याचे पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार

खातेवाटपावरुन वाद नाही

तीन वेगवेगळ्या पक्षांचे सरकार आहे. खाते वाटपावरुन वाद आहे अशी चर्चा करु नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. खातेवाटप हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. तीन पक्षांचे आणि मित्र पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे चर्चा करुनच निर्णय झाला आहे. उद्या संध्याकाळी खातेवाटप, पालकमंत्री नेमले जातील असा निर्णय आज बैठकीत झाल्याचे अजित पवार म्हणाले. आजच्या बैठकीमध्ये मंत्र्यांना ज्येष्ठतेनुसार दालन देण्याबाबतही चर्चा झाली, त्याचा अंतिम निर्णय झाला आहे. कार्यकर्त्यांना भेटण्या संदर्भात विस्तारित दालन देण्याबाबतही चर्चा झाली.

आमच्या पक्षाचे सर्व निर्णय पवारसाहेब घेतील

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्या नेत्याला कोणते पद मिळणार असा प्रश्न अजित पवार यांना केल्यानंतर पवार म्हणाले की, आमच्या पक्षाचे सर्व निर्णय हे पवारसाहेब घेतील. कोणत्या नेत्यावर कोणती जबाबदारी द्यायची हे पवारसाहेब ठरवतील. त्याबाबत तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांची सकारात्मक चर्चा झाली आहे. त्याचा अंतिम निर्णय उद्या होणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

Last Updated : Jan 1, 2020, 9:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details