गृहमंत्र्यांवरील आरोपानंतर राज्यातील मंत्र्यांचे फोन 'नॉट रिचेबल' - anil deshmukh mansukh hiren case
माजी मुंबई पोलीस परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर खळबळजनक आरोपाचा बॉम्ब फोडला. राज्यात या बॉम्बने खळबळ माजल्याने महाविकास आघाडी सरकारमधील सर्वपक्षीय मंत्र्यांचे फोन बंद आहेत. नवाब मलिक, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, नाना पटोले, अनिल परब, मनिषा कायंदे, अतुल लोंढे यासह काही नेत्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फोन 'नॉट रिचेबल' आले आहेत.
मुंबई- पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर खळबळजनक आरोपाचा बॉम्ब फोडला. राज्यात या बॉम्बने खळबळ माजल्याने महाविकास आघाडी सरकारमधील सर्वपक्षीय मंत्र्यांचे फोन बंद आहेत. नवाब मलिक, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, नाना पटोले, अनिल परब, मनिषा कायंदे, अतुल लोंढे यासह काही नेत्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फोन 'नॉट रिचेबल' आले आहेत.
मुकेश अंबानी यांच्या घर परिसरात कार आढळून आल्यानंतर कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला. चकमकबाज पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने याप्रकरणात अटक केली. एनआयएच्या तपासात वाझे यांच्या अनेक गंभीर चुका आढळून आल्याने पोलीस दलाच्या प्रतिमेवरही शंका उपस्थित झाल्या. राज्य सरकारदेखील यामुळे अडचणीत आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तत्काळ खांदेपालट केली. तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची आयुक्त पदावरून उचलबांगडी करून गृहरक्षक दलाचा कार्यभार सोपवण्यात आला. संतप्त झालेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेवर वसुलीची जबाबदारी सोपवल्याचा गंभीर आरोप आज केला. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आठ पानी पत्र लिहिले. पत्रामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सर्व मंत्र्यांनी आपले फोन बंद ठेवत, नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे हे नेते गेले कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे.