मुंबई - राज्य विधीमंडळाच्या अध्यक्ष पदाची निवडणूक आणि विधान परिषदेच्या 12 सदस्य पदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. ( Meeting with Governor ) दरम्यान, सकारात्मक चर्चा झाली. 9 तारखेला अध्यक्ष पदाची निवडणूक घ्यावी, अशी मागणी केल्याचे माहिती आघाडीच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात मंत्री एकनाथ शिंदे, जयंत पाटील, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, अनिल परब, नाना पटोले, सतेज पाटील शिष्टमंडळात उपस्थित होते. ( Ministers Delegation Meeting with Governor Bhagatsingh Koshyari )
राज्यपाल आणि आघाडी सरकारमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषण यावेळी झाले. दरम्यान, अभूतपूर्व गोंधळामुळे राज्यपालांनी अभिभाषण अर्धवट सोडून सभागृहातून काढता पाय घेतला. हा गोंधळ सुरु असतानाच, आता महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा आणि विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर चर्चा झाली. तब्बल अर्धा तासापेक्षा अधिक वेळ बैठक चालली. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
Meeting with Governor : 12 आमदारांच्या निवडीसंदर्भात राज्यपाल सकारात्मक - मंत्री एकनाथ शिंदे; शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट - शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सदस्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. ( Meeting with Governor ) यावेळी विधिमंडळाच्या 12 सदस्य निवडीसंदर्भात राज्यपालांच्या सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदेंनी ( Minister Eknath Shinde ) दिली.
अध्यक्षपद निवडणुकीसाठी विनंती -
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या विषयावर राज्यपालांशी चर्चा केली. तसेच विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी परवानगी मिळावी, अशी विनंती राज्यपालांकडे केल्याचे शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 9 मार्च रोजी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी परवानगी मागितली. ती तारीख सोयीची वाटते. राज्यपाल याबाबत कळवतील, असे शिंदे म्हणाले.
राज्यपालांशी सकारात्मक चर्चा -
राज्यपालांशी सकारात्मक चर्चा झाली. त्यांच्याकडूनही सकारात्मक उत्तर अपेक्षित आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ नये, असे भाजपचे प्रयत्न आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. तसेच भाजपला आज उच्च न्यायालयानेही यावरुन कानपिचक्या दिल्याचे ते म्हणाले. तर विधानभवनात गुरुवारी झालेल्या प्रकाराबाबत चर्चा झाली का? या बाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्रकारांशी छेडले असता, त्यावेळी जे झाले ते झाले. ते सर्व आता मागे टाका आणि विधान परिषदेच्या 12 आमदारांची फाईल मार्गी लावा, असे पटोले म्हणाले.