मुंबई - बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावरील पहिले नॉन क्रिटिकल कोव्हिड रुग्णालय सोमवारपासून सुरू होईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि टोपे यांनी काल (शुक्रवार) संध्याकाळी या रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी टोपे यांनी सोमवारपासून या रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू होतील असे सांगितले.
बीकेसीतील कोव्हिड रुग्णालय सोमवारपासून सुरू, मंत्री टोपेंसह शरद पवारांनी केली पाहणी - शरद पवार यांची बीकेसीतील कोव्हिड रुग्णालयास भेट
मुंबईच्या सरकारी आणि पालिकेच्या रुग्णालयावर पडणारा ताण आणि रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बीकेसीत वुहानच्या धर्तीवर कोव्हिड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, 15 दिवसांतच एमएमआरडीएने 1008 बेडचे नॉन क्रिटिकल कोव्हिड रुग्णालय बांधून पूर्ण केले आहे. आज आरोग्य मंत्री टोपे आणि शरद पवार यांनी या रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली.
बीकेसी कोविड रुग्णालयाची मंत्री टोपेंसह शरद पवारांनी केली पाहणी
हॉस्पिटलचे 95 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून रविवारपर्यत काम 100 टक्के पूर्ण करत सोमवारपासून रुग्णसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे हा मोठा दिलासा मानला जात आहे. दरम्यान येथे नॉन क्रिटिकल रुग्णांवर येथे उपचार करण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे येथे आणखी 1000 बेड वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. शिवाय, येथे गंभीर स्थितीतील रुग्णांसाठी 450 आयसीयू बेडही तयार करण्यात येण्याची शक्यता आहे.