मुंबई - चीनमधील गुंतवणूक काढून घेऊन ती गुंतवणूक इतरत्र वळताना दिसत आहे. भारताकडे या गुंतवणुकीचा जास्त ओढा आहे. त्यातही या गुंतवणूकदारांचे महाराष्ट्र हे पहिले पसंतीचे राज्य राहिले आहे. राज्यात उद्योगासाठी असलेल्या सुविधा आणि औद्योगिक वातावरण हे या पसंतीचे कारण असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
महाराष्ट्र गुंतवणूकदारांच्या पसंतीचे राज्य, विदेशी उद्योजकांसोबत बोलणं सुरू - उद्योग मंत्री - महाराष्ट्रातील गुंतवणूकदार
राज्यामध्ये कुशल मनुष्यबळ आहे. त्यामुळे जगभरातील उद्योग महाराष्ट्रात येऊ इच्छितात. त्यासाठी आम्ही एक कृती दल स्थापन केलेलं आहे. यामध्ये उद्योगाचे प्रधान सचिव, एमआयडीसीचे कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले.
![महाराष्ट्र गुंतवणूकदारांच्या पसंतीचे राज्य, विदेशी उद्योजकांसोबत बोलणं सुरू - उद्योग मंत्री industry minster subhash desai investors in maharashtra maharashtra business news महाराष्ट्रातील गुंतवणूकदार महाराष्ट्र उद्योग मंत्री सुभाष देसाई](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7127425-thumbnail-3x2-deshai.jpg)
राज्यामध्ये खासकरून कुशल मनुष्यबळ आहे. त्यामुळे हे उद्योग महाराष्ट्रात येऊ इच्छितात. त्यासाठी आम्ही एक कृती दल स्थापन केलेला आहे. यामध्ये उद्योगाचे प्रधान सचिव, एमआयडीसीचे कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या वाटाघाटी सुरू झालेल्या आहेत. त्यातून आम्हाला असे दिसते की, अमेरिका, इंग्लंड आणि जर्मनी यांच्या बरोबरीने जपान, तायवान आणि दक्षिण कोरिया हे उद्योजक महाराष्ट्राशी बोलणं करू लागले असल्याचे देसाई म्हणाले.
प्रगती होईल तसतसा तपशीलही जाहीर केला जाईल. मात्र, अनेक विदेशी गुंतवणूकदार महाराष्ट्राशी वाटाघाटी करण्यास तयार झालेले आहेत. ही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून चांगली आश्वासक गोष्ट असल्याचे देसाई यांनी सांगितले.