महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेल्वेच्या गुन्ह्याबाबत महाराष्ट्राचा देशात नंबर पहिला - रेल्वेच्या गुन्ह्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला

नॅशनल क्राईम ब्युरोच्या अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये रेल्वेच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. तर राजधानी दिल्ली दुसऱया क्रमांकावर आहे. 2018 मध्ये महाराष्ट्रात रेल्वेच्या हद्दीत तब्बल 46461 गुन्हे घडले असून तशा प्रकारची अधिकृत नोंद महाराष्ट्रातील रेल्वेच्या हद्दीत असलेल्या वेगवेगळ्या जीआरपी पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आलेली आहे. तर या यादीत दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर असून 2018 साली तब्बल 34076 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

mumbai
रेल्वेच्या गुन्ह्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला

By

Published : Jan 14, 2020, 8:29 PM IST

मुंबई - केंद्राला सर्वाधिक महसूल देण्यामध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर असतो. रेल्वेच्या महसुलाबद्दल बोलायचे झाले तर महाराष्ट्रातून सर्वाधिक महसूल रेल्वेला दरवर्षी दिला जातो. मात्र, हाच महाराष्ट्र आता रेल्वेच्या हद्दीत होणाऱ्या गुन्ह्यांच्या संदर्भातसुद्धा आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

रेल्वेच्या गुन्ह्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला

हेही वाचा -वाडिया रुग्णालयाचे अनुदान तत्काळ द्या, स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश

नॅशनल क्राईम ब्युरोच्या अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये रेल्वेच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. तर राजधानी दिल्ली दुसऱया क्रमांकावर आहे. 2018 मध्ये महाराष्ट्रात रेल्वेच्या हद्दीत तब्बल 46461 गुन्हे घडले असून तशा प्रकारची अधिकृत नोंद महाराष्ट्रातील रेल्वेच्या हद्दीत असलेल्या वेगवेगळ्या जीआरपी पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आलेली आहे. तर या यादीत दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर असून 2018 साली तब्बल 34076 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

हेही वाचा -'मंत्रालयातील खेटे वाचवा'; रांगेतील नागरिकांची उद्रेकी भावना

एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुन्ह्यांची नोंद होण्याचे कारण म्हणजे रेल्वे प्रवासात रेल्वेच्या प्रवाशांचे पाकीट, मोबाईल फोन किंवा इतर महत्त्वाच्या वस्तू चोरीस गेल्यानंतर आत्तापर्यंत यांची गहाळ झाल्याची नोंद जीआरपी पोलिस ठाण्यांमध्ये घेतली जात होती. मात्र, काही वर्षांपूर्वी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार मोबाईल फोन, पर्स सारख्या गोष्टी हरवल्यास त्याची रीतसर तक्रार पोलीस ठाण्यांमध्ये घेतली जात असल्यामुळे महाराष्ट्रात रेल्वेच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचेही सांगितले जात आहे.

हेही वाचा -वाडिया रुग्णालयाला सरकारकडून ४६ कोटींचा निधी.. बुधवारपासून सर्व सेवा होणार सुरू

मध्य रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त के. के. अश्रफ यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून आरपीएफतर्फे रेल्वेच्या हद्दीत होणाऱ्या गुन्ह्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतून, महाराष्ट्रातून तसेच बाहेरच्या राज्यात जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांची संख्या अधिक असल्यामुळे परिणामी गर्दी सुद्धा वाढत आहे. या गोष्टीला अनुसरून वाढणाऱ्या गुणांवर अंकुश ठेवण्यासाठी जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलिसांकडून धडक कारवाई केली जात असून यामुळे गुन्ह्यांची संख्यासुद्धा वाढली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -'विनापरवाना खोदकाम करत असल्याने कामगारांना मारहाण केली'

आरपीएफतर्फे रेल्वे परिसरात सतत प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते. आरपीएफने केलेल्या कारवाईत अपंगांसाठी आरक्षित असलेल्या रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात, तिकिट दलालांच्या विरोधात किंवा इतर गुह्यांच्या विरोधात सतत मोहिम सुरू असते. प्रवाशांनीही प्रवासादरम्यान स्वतःची काळजी घेतल्यास गुन्ह्यांचा आकडा कमी होईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.


मुंबईतील लोकल रेल्वे, एक्सप्रेस आणि रेल्वेच्या हद्दीत घडलेले गुन्हे

खून - 2017-18 (2), 2018-19 (9)

दरोडा - 2017-18 (569), 2018-19 (1050)

बलात्कार - 2017-18 (5), 208-19 (1)

विनयभंग - 2017-18 (72), 2018-19 (94)

इतर गुन्हे - 2017-18 (204), 2018-19 (271)

एकूण गुन्हे - 2017-18 (23654), 2018-19 (25412)

ABOUT THE AUTHOR

...view details