मुंबई -महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती चांगली आहे. याउलट इतर राज्यांमधील पक्षांना ते कोरोना परिस्थिती हाताळण जमले नाही. त्यामुळे तिथे आज चिता पेटलेल्या आहेत, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत केली आहे. महाराष्ट्रात सरकारला समांतर अशी यंत्रणा राजकीय कार्यकर्ते उभे करत आहेत. म्हणूनच महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती चांगली आहे, असेही राऊत यांनी सांगितले. ते आज (दि. 9 मे) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्रातही परिस्थिती वेगळी आहे. राजकीय कार्यकर्ते समांतर अशी यंत्रणा उभी करत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती नियंत्रणात आहे. पुण्यात शिवसेनेच्या माध्यमातून तीन कोविड सेंटर उभारण्यात आले असून युवासेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या तीन कोविड सेंटरचे उद्घाटन झाले आहे.
'देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधान मोदींकडून उत्तर’
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीवर टीका करत मृत्यूचे आपल्याला पुढे जातात, असा आरोप केला होता. यावर बोलताना राऊत यांनी सांगितले की, “देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना अशाप्रकारचे वक्तव्य करणे हे बहुधा विरोधी पक्षाच्या कार्याचा भाग असेल. त्यांच्या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलेले आहे”, असा टोला त्यांनी लगावला फडणवीस यांना लगावला आहे.
'राष्ट्रीय स्तरावर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे'
“तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये एकहाती मुसंडी मारली. त्याने भविष्यामध्ये देशात विरोधी पक्षाची भक्कम आघाडी उभी करावी आणि एक आव्हान भारतीय जनता पक्ष उभा करावा, अशी सगळ्यांची इच्छा आहे. या आघाडीचा आत्मा नक्कीच काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही. काँग्रेस पक्षाला आसाममध्ये चांगले यश मिळाले आहे. पण, सत्तेवर येऊ शकले नाही. केरळ आणि तामिळनाडूत त्यांना थोडेफार यश आल आहे. पण, काँग्रेसने अजून मुसंडी मारणे जास्त गरजेचे आहे. राष्ट्रीय स्तरावर देखील अशी नवनवीन व्यवस्था निर्माण करावी. सगळ्यांनी एकत्र यावे, अशा प्रकारचे मत मी व्यक्त केले आहे”, असे राऊत म्हणाले.
हेही वाचा -आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद दिले तसेच बहुजनांचे सुद्धा पालकत्व स्वीकारा - गोपीचंद पडळकर