मुंबई -राज्यात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा उच्चांक गाठला जातोय. त्यामुळे राज्य सरकारने आपला लसीकरणाचा वेग देखील वाढवला आहे. मात्र सध्या राज्याकडे लसीचा तुटवडा असून केवळ येणाऱ्या तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा राज्याकडे उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच राज्याला दर आठवड्याला 40 लाख लस उपलब्ध करून द्यावी, अशी केंद्राकडे मागणी केली आहे. मात्र सध्या केंद्र सरकार ज्या गतीने लस पुरवठा राज्याला केला जातोय, ती गती समाधानकारक नाही, अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकार विरोधात नाराजीही व्यक्त केली.
महाराष्ट्रात लसीचा तुटवडा, केवळ ३ दिवस पुरेल एवढी लस राज्यात उपलब्ध - आरोग्यमंत्री - राजेश टोपे कोरोना लस
सध्या राज्याकडे लसीचा तुटवडा असून केवळ येणाऱ्या तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा राज्याकडे उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
![महाराष्ट्रात लसीचा तुटवडा, केवळ ३ दिवस पुरेल एवढी लस राज्यात उपलब्ध - आरोग्यमंत्री maharashtra health minister rajesh tope on covid-19 Vaccines Stocks in the state](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11312677-215-11312677-1617783232878.jpg)
महाराष्ट्रात लसीचा तुटवडा, केवळ ३ दिवस पुरेल एवढी लस राज्यात उपलब्ध - आरोग्यमंत्री
राजेश टोपे पत्रकार परिषदेत बोलताना...
Last Updated : Apr 7, 2021, 2:14 PM IST