मुंबई - कोरोनाचे संकट कायम असतानाच देशात सध्या बर्ड फ्लूने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकर आणि कुक्कुटपालन करणारे व्यावसायिक धास्तावले आहेत. महाराष्ट्रातही बर्ड फ्लू या महामारीने शिरकाव केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यूपी, केरळ, राजस्थान, एमपी, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि गुजरात नंतर महाराष्ट्र आता बर्ड फ्लूचा शिरकाव झालेले आठवे राज्य ठरले आहे. राज्यातील परभणी जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचे संकट ओढावल्याचे स्पष्ट झाले असून या ठिकाणी तब्बल 800 कोबड्या मरण पावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी ५ वाजता बर्ड फ्ल्यूच्या दृष्टीने आढावा बैठक घेणार आहेत.
राज्यात नागपूर, मुंबई, लातूर या जिल्ह्यात ही कावळे, पोपट, कोबंड्या, बगळे या पक्षांचा अचानक मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र, त्यानंतर या पक्षांचे मृत्यू कोणत्या कारणामुळे झाले याची तपासणी करण्या करिता नमुने भोपाळच्या प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. दरम्यान परभणीमधील मृत कोंबड्यांच्या अहवाल हा बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट करत आहे. त्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे 4 दिवसांपूर्वी 800 कोंबड्यांचा दोन दिवसांच्या दरम्यान मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या कोंबड्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ज्यामध्ये कोंबड्यांच्या मृत्यूचे कारण 'बर्ड-फ्लू'च असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मुरुंबा गावात 8 हजार कोंबड्या; सर्व पाळीव पक्षी नष्ट करण्याचे आदेश -
मुरुंबा या गावात आठ पोल्ट्री फार्म असून त्यामध्ये आठ हजार कोंबड्या आहेत. चार दिवसांपूर्वी सलग दोन दिवसात 800 कोंबड्यांच्या अचानक मृत्यू झाला. याशिवाय गावातील अन्य पक्षांचे देखील मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. तसेच परभणी शहरातील नारायण चाळ परिसरात देखील तीन कोंबड्या अज्ञात आजाराने मरण पावल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे तात्काळ पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आणि पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टरांनी मुरुंबा गावात तळ ठोकून गावातील सर्व पक्षांचे त्यांनी नमुने घेऊन पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यानंतर त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सर्व गावकऱ्यांची होणार तपासणी -
कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता हा आजार गावकऱ्यांच्या माध्यमातून पसरू नये म्हणून तत्काळ मुरुंबा आणि परिसरातील दहा किलोमीटरच्या गावात राहणाऱ्या ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिले आहेत. तसेच आता जिल्ह्यात बाहेर राज्यतून कोंबड्या खरेदी विक्रीला बंदी घालण्यात आली आहे.
नागपुरात पक्ष्यांचा मृत्यू-