महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Swatantryaveer Savarkar Theme Park : नाशिकमध्ये उभारणार भव्य 'सावरकर थीम पार्क आणि पर्यटन सर्कीट', राज्य सरकारचा निर्णय - Vinayak Damodar Savarkar

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान असलेल्या भगूर जिल्हा नाशिक येथे भव्य सावरकर थीम पार्क आणि संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्यांचे कार्य जगभरात पोहचवण्यासाठी देशातील पहिले वीर सावरकर पर्यटन सर्कीट तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्या रविवारी २६ फेब्रुवारी रोजी अभिवादन पदयात्रा काढली जाणार आहे.

Savarkar Theme Park
सावरकर थीम पार्क

By

Published : Feb 25, 2023, 9:23 AM IST

मुंबई :स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता. त्यांना काळया पाण्याची शिक्षा झाली होती. अष्टभूजा देवी मंदिर आणि सावरकर यांचे जन्मस्थान भगूर वाडा, पुणे येथील सावरकर अध्यासन केंद्र, नाशिक, पहिली विदेशी कपड्यांची होळी, शिरगाव रत्नागिरी येथे सावरकर वास्तव्यास होते ती खोली. अभिनव भारत मंदिर तिळभांडेश्वर गल्ली, डेक्कन, पतितपावन मंदिर रत्नागिरी येथील, गुरव समाजाचे मारूती मंदिर जिथे डॉ. हेडगेवार आणि सावरकर यांची पहिली भेट झाली होती, सावरकारांनी सुरू केलेली कन्या शाळा, विठ्ठल मंदिर, सावरकर स्मारक दादर, सावरकर सदन, बाबाराव सावरकर स्मारक सांगली या ठिकाणांचा पर्यटन सर्किटमध्ये समावेश करण्यात आला आहे.

उद्या कार्यक्रम : उद्या २६ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी आठ वाजता भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे. भगूरमधील नूतन विद्यालय ते सावरकर वाडा अशी ती होणार आहे. अष्टभुजा देवीची पालखीचाही सहभाग या पदयात्रेत असणार आहे. सकाळी ९ ते १०.३० या दरम्यान सावरकर वाडा येथील मुख्य कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक चारुदत्त दीक्षित आणि सहकलाकारांचे स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित गीतांचे गायन, योगेश सोमण लिखित दिग्दर्शित सावरकर, आदित्य धलवार यांचे अभिवाचन होणार आहेत.

थीम पार्क, संग्रहालय :सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या भगूर जिल्हा नाशिक येथे भव्य सावरकर थीम पार्क उभारले जाणार आहे. तसेच सावरकर यांच्या आठवणी ताज्या करणारे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. यात सावरकर यांची पुस्तके, लिहिलेली पत्र, वस्तू आदींचा समावेश असेल. थीम पार्क आणि संग्रहालयासाठी पुढाकार महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाने घेतला आहे.

भारतरत्न देण्याची मागणी :स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारताचा सर्वोच्च किताब भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी शिवसेनेकडून सातत्याने केली जात आहे. मात्र या मागणीकडे केंद्रातील सर्व पक्षातील सरकारने दुर्लक्ष केले आहे. सावरकरांना भारतरत्न हा किताब द्यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नुकताच एक ठराव करण्यात आला आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार भाजपाच्या पाठिंब्यावर आले आहे. यामुळे आता तरी केंद्र सरकार सावरकर यांना भारतरत्न देणार का याकडे सावरकर प्रेमिंचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :Aurangabad as Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर नाव शहराचे की जिल्ह्याचे? केंद्राच्या पत्राने संभ्रम, मात्र जल्लोष राज्यभर

ABOUT THE AUTHOR

...view details