मुंबई :सध्या तुरुंगात असलेल्या गुन्हेगार विजय पालांडे (Criminal Viday Palande) यांने आयपीएस अधिकारी देवेन भारती (IPS officer Deven Bharti accused) यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत आयपीएस अधिकारी संजय पांडे (ते डीजी होमगार्ड असताना) यांचा चौकशी अहवाल (Sanjay Pande Inquiry Report) राज्य सरकारने फेटाळला आहे. पालांडे यांनी भारती यांच्यावर अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा दावा करत अनेक आरोप केले होते. हत्येसह अनेक गुन्ह्यांमध्ये दोषी ठरल्यानंतर पालांडे हा नवी मुंबईतील तळोजा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. Latest news from Mumbai, Mumbai Crime
Sanjay Pande Inquiry Report : देवेन भारती यांच्याबाबतचा संजय पांडे यांचा चौकशी अहवाल राज्य सरकारने फेटाळला - गुन्हेगार विदय पालांडे
सध्या तुरुंगात असलेल्या गुन्हेगार विजय पालांडे (Criminal Viday Palande) यांने आयपीएस अधिकारी देवेन भारती (IPS officer Deven Bharti accused) यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत आयपीएस अधिकारी संजय पांडे (ते डीजी होमगार्ड असताना) यांचा चौकशी अहवाल (Sanjay Pande Inquiry Report) राज्य सरकारने फेटाळला आहे.
देवेन भारती हे अंडरवर्ल्ड लिंक्समध्ये दोषी नाही -राज्य सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, पालांडे यांनी आरोप केल्यानंतर चौकशी करण्यात आली. 2020 मध्ये तत्कालीन पोलिस महासंचालक आणि तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांना अहवाल पाठवण्यात आला. तपासात देवेन भारती हे अंडरवर्ल्ड लिंक्समध्ये दोषी आढळले नाही.
तथ्य असल्याचा निष्कर्ष -माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी होमगार्ड दलाचे तत्कालीन डीजी संजय पांडे यांच्या स्वीय सहाय्यकामार्फत आदेश दिल्यानंतर पुन्हा नव्याने चौकशी सुरू करण्यात आली. पांडे (आता कारागृहात) यांनी देशमुख यांना अहवाल सादर केला होता असून, आरोपात तथ्य असल्याचा निष्कर्ष काढला आहे.