मुंबई -महाराष्ट्र सरकारने अखेर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली आहे. मात्र, आज पहिल्याच दिवशी दिल्लीला जाणारे एअर इंडियाचेविमान पूर्वसूचना न देता रद्द झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटला.
मुंबईत आजपासून विमान सेवा सुरू, दिल्लीला जाणारे विमान रद्द झाल्याने प्रवासी नाराज - देशांतर्गत प्रवासाला परवानगी
महाराष्ट्र सरकारने अखेर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज 25 टेक ऑफ आणि 25 लँडिंगला परवानगी दिली आहे.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज 25 टेक ऑफ आणि 25 लँडिंगला परवानगी दिली आहे. विमान कंपन्यांना त्यांना दिलेल्या स्लॉटनुसार उड्डाण करावे लागणार आहेत. विमानततळावर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करू नये, यासाठी विमानतळ अधिकारी प्रयत्न करत आहेत.
विमानतळावर गर्दी पाहायला मिळत असली तरी, कुठेही सोशल डिस्टंसिंगचे नियम मोडले जाणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे. सुरक्षा दलाला थर्मल स्क्रीनिंग करावी लागणार असल्याने प्रवाशांना विमानतळावर प्रवेश करण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत आहे. प्रत्येक प्रवाशांने त्याच्या मोबाइल फोनवर आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केले आहे का? ते तपासले जात आहे.