मुंबई -राज्यातील विविध शिक्षक संघटनांकडून शाळा सुरू असतानाही त्यासाठी सुट्टी घेऊन आयोजित केल्या जाणाऱ्या शिक्षक अधिवेशनाला चाप लावण्याचा निर्णय आज शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यात यापुढे शिक्षक आणि शिक्षकेतरांची अधिवेशने ही दीर्घ सुट्टीच्या म्हणजेच दिवाळी अथवा उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत घेण्यात यावेत, असे परिपत्रक आज शालेय शिक्षण विभागाने जारी केली असून, यावर विविध शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शिक्षक संघटनेच्या अधिवेशनाला चाप; सुट्टीच्या कालावधीतच आता अधिवेशने होणार - TEACHERS ASSOCIATION GATHERING NEWS
राज्यात शाळा सुरू असताना अनेक शिक्षक संघटनांकडून आपल्या संघटनांची अधिवेशने आयोजित केली जात असतात. त्यासाठी शिक्षण विभागाकडून त्यांना भरपगारी रजाही मंजूर केली जाते. यासाठी असंख्य शिक्षक या अधिवेशनाच्या नावाखाली भरपगारी रजा घेतल्याची बाब समोर आल्याने शिक्षण विभागाने ही पाऊले उचलली आहेत.
राज्यात शाळा सुरू असताना अनेक शिक्षक संघटनांकडून आपल्या संघटनांची अधिवेशने आयोजित केली जात असतात. त्यासाठी शिक्षण विभागाकडून त्यांना भरपगारी रजाही मंजूर केली जाते. यासाठी असंख्य शिक्षक या अधिवेशनाच्या नावाखाली भरपगारी रजा घेतल्याची बाब समोर आल्याने शिक्षण विभागाने ही पाऊले उचलली आहेत. नवीन परिपत्रकानुसार शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा कालावधी तीन दिवसांवर तर जिल्हास्तरीय अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांवर आणण्यात आला आहे.
शिक्षकांच्या अधिवेशनात मोठ्या प्रमाणात राजकीय भाषणे, त्यासाठीचे अजेंडे आणि त्यासंदर्भात कार्यक्रम काही संघटनांकडून केल्या जात होते. त्यालाही आता चाप लावण्यात आला आहे. यापुढे या अधिवेशनात केवळ शैक्षणिक क्षेत्रासंदर्भातच कार्यक्रमांचा समावेश असावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. एकदा अधिवेशनासाठी सुट्टी घेतल्यास पुढे वर्षभरात इतर अधिवेशनासाठी सुट्टी दिली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.