मुंबई - देशव्यापी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने केशरी शिधापत्रिकाधारकांना ३ किलो गहू ८ रुपये प्रतिकिलो दराने आणि २ किलो तांदूळ १२ रुपये किलो दराने वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबतचे निवेदन काढण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारकडून अन्नधान्यांवर मिळणार सबसीडी, केशरी शिधा पत्रिकाधारकांना मिळणार लाभ - saffron ration cards
मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत निवेदनानुसार, राज्य सरकार केशरी शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच दारिद्र्य रेषे (एपीएल) वरील लोकांसाठी मे आणि जून महिन्यात रेशनचे वितरण करणार आहे.
महाराष्ट्र सरकारकडून अन्नधान्यांवर मिळणार सबसीडी, केशरी शिधा पत्रिकाधारकांना मिळणार लाभ
राज्य सरकार केशरी शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच दारिद्र्य रेषे (एपीएल) वरील लोकांसाठी मे आणि जून महिन्यात रेशनचे वितरण करणार आहे. या माध्यमातून सुमारे साडेचार लाख मेट्रिक टन अन्नधान्य वितरण केले जाणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.