महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वैद्यकीय प्रवेशासाठी एसईबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी - SEBC Reservation Ordinannce

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकार अध्यादेश काढला होता. या अध्यादेशावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केली आहे.

मुंबई

By

Published : May 20, 2019, 6:13 PM IST

Updated : May 20, 2019, 6:47 PM IST

मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने अध्यादेश काढला होता. या अध्यादेशावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केली आहे.

आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाची परवानगी आवश्यक होती. निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर अध्यादेशावर राज्यपालांची सही होणे बाकी होते. राज्यपालांनी स्वाक्षरी केल्याने आता वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

Last Updated : May 20, 2019, 6:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details