महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्य सरकारकडून लॉकडाऊन-5 घोषित; कंटेन्मेंट झोन वगळता अन्य ठिकाणी सूट - महाराष्ट्रात लॉकडाऊन-5

केंद्रापाठोपाठ आज महाराष्ट्र सरकारने देखील लॉकडाऊन-5 ची नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीत कंटेन्मेंट झोन वगळता अन्य ठिकाणी अटी-शर्तीसह सुट देण्यात आली आहे.

Mantralaya
मंत्रालय

By

Published : May 31, 2020, 6:39 PM IST

मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अपरिहार्य ठरलेला लॉकडाऊन केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत वाढवण्याचे कालच निश्चित केले. केंद्रापाठोपाठ आज महाराष्ट्र सरकारने देखील लॉकडाऊन-5 ची नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीत कंटेन्मेंट झोन वगळता अन्य ठिकाणी अटी-शर्तीसह सुट देण्यात आली आहे.

  • नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार काय उघडणार? काय बंद राहणार? -
  • सायकलिंग, रनिंग, वॉकिंग अशा व्यायामांना परवानगी
  • सार्वजनिक मैदानेही खुली होणार
  • समुद्र किनाऱ्यांवर जाण्यासही परवानगी
  • धार्मिक स्थळे बंदच राहणार
  • स्डेडियम बंद राहणार
  • लांबच्या प्रवासावर बंदी
  • शाळा, महाविद्यालये बंद राहणार
  • मेट्रो बंद राहणार
  • १ जूनपासून राज्यात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू होत आहे. याचेही उप टप्पे तयार केले असून पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल उघडले जातील. मात्र यासाठी नियम आणि अटी लागू असतील. दुसऱ्या उपटप्प्यात शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्था उघडल्या जातील. मात्र त्याबाबत राज्य सरकार आपल्या स्तरावर निर्णय घेतील. पालकांशी चर्चा करुन त्याबाबत निर्णय घेतला जाईल. तिसऱ्या उपटप्प्यात आंतरराष्ट्रीय विमान सेवा, मेट्रो रेल्वे, सिनेमा थिएटर, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेन्मेंट पार्क, बार आणि ऑडिटोरियम याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.

    असा होता लॉकडाऊन :

    पहिला लॉकडाऊन – 25 मार्च ते 14 एप्रिल

    दुसरा लॉकडाऊन – 15 एप्रिल ते 3 मे

    तिसरा लॉकडाऊन – 4 मे ते 17 मे

    चौथा लॉकडाऊन – 18 मे ते 31 मे

    पाचवा लॉकडाऊन – 1 जून ते 30 जून

ABOUT THE AUTHOR

...view details