महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gad Durg Rakshana Samiti Mahamorcha : गड, दुर्गांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीचा आज महामोर्चा - Maharashtra Gad Durg Rakshana Samiti

राज्यातील गड-दुर्गांची स्थिती आज दयनीय झाली आहे. त्याकडे लक्ष देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक आणि महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीचे समन्वयक सुनील घनवट यांनी महामोर्चाचे आयोजन केले आहे. आज दुपारी 12 वाजता मेट्रो आयनॉक्स सिनेमा येथून मोर्चाला सुरूवात होणार आहे.

Gad Durg Rakshana Samiti Mahamorcha
महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीचा महामोर्चा

By

Published : Mar 3, 2023, 9:58 AM IST

मुंबई : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या गड-दुर्गांची स्थिती आज दयनीय झाली आहे. त्यांच्याकडे लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. अनेक गड-दुर्गांवर अवैधपणे घरे, कबरी, दर्गे, मशिदी आणि अन्य बांधकामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. गड-दुर्गांवरील ही अतिक्रमणे तातडीने हटवायला हवीत. या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीने आज शुक्रवारी 3 मार्च रोजी मुंबई महामोर्चाचे आयोजन केले आहे.



अतिक्रमणे रोखणे गरजेचे :राज्यातील एकूणच गड-दुर्गांची संख्या, अतिक्रमणांची व्याप्ती, संवर्धनाची आवश्यकता हे सर्व पहाता गड-दुर्गांचे जतन, संवर्धन, रक्षण आणि अतिक्रमणे रोखणे गरजेचे आहे लक्षात येत आहे. यांसाठी स्वतंत्र गड-दुर्ग महामंडळाची राज्य सरकारने स्थापना करावी, या मागण्यांसाठी मुंबईत गड-दुर्ग रक्षण महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक आणि महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली.


गड-दुर्ग रक्षण महामोर्चा : गड-दुर्ग रक्षण महामोर्चाचा आरंभ दुपारी 12 वाजता मेट्रो आयनॉक्स सिनेमा येथून होणार आहे. तर या मोर्च्याचा शेवट आझाद मैदान येथे होणार असल्याचे सुनील घनवट यांनी सांगितले. या मोर्च्यामध्ये राज्यभरातून विविध गड-दुर्गप्रेमी संघटना आणि छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचे 25 हून अधिक वंशज, यांसह विविध संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचेही सुनील घनवट यांनी यावेळी सांगितले.


सर्व गडकिल्ल्यांवर अतिक्रमणे : किल्ले रायगड, किल्ले विशाळगड, किल्ले कुलाबा, किल्ले लोहगड, किल्ले वंदनगड आदींवर अतिक्रमणे झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर श्रीक्षेत्र मलंगगड यालाही हाजी मलंग बनवण्याचे षड्यंत्र चालू आहे. ठाण्यातील दुर्गाडी किल्ल्यावर ईदला नमाजपठण होते. तेव्हा मंदिरात पूजेलाही बंदी केली जाते. असा आरोपही सुनील घनवट यांनी केला. विशाळगडावरील देवतांची मंदिरे, बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू यांची समाधी जीर्णावस्थेत आहे. तसेच अनेक ठिकाणी गडाची दुःस्थिती झालेली दिसून येते. मात्र गडावरील दर्ग्याचे सुशोभिकरण करत अतिक्रमण वाढतच आहे. हे वेळीच रोखले नाही, तर उद्या प्रत्येकच गड-दुर्गांची ही स्थिती होईल. राज्यातील 35 महत्त्वाच्या गड-दुर्गांवरील अशी अतिक्रमणे हटवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी आमची मागणी आहे. असेही घनवट यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :Shah Rukh Khan News : शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यात दोन जण घुसले, पोलिसांचा तपास सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details