महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मुख्यमंत्री १-२ वर्षांनी बदलला जाऊ शकतो, तर गटनेता बदलला तर काय झालं?' - महाराष्ट्राचे राजकारण

महाराष्ट्रात सर्वात जास्त १६२ आमदारांचे संख्याबळ आमच्या महाविकास आघाडीकडे आहे. काल (सोमवार) शरद पवार यांनी व्हीपबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जर मुख्यमंत्री एक, दोन वर्षांनी बदलला जाऊ शकतो, तर मग गटनेता बदलला तर काय झालं? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपला विचारला.

maharashtra election 2019 : chhagan bhujbal on NCP legislative party leader
'मुख्यमंत्री १-२ वर्षांनी बदलला जाऊ शकतो, तर गटनेता बदलला तर काय झाल?'

By

Published : Nov 26, 2019, 11:56 AM IST

Updated : Nov 26, 2019, 12:16 PM IST

मुंबई- महाराष्ट्रात सर्वात जास्त १६२ आमदारांचे संख्याबळ आमच्या महाविकास आघाडीकडे आहे. काल (सोमवार) शरद पवार यांनी व्हीपबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जर मुख्यमंत्री एक, दोन वर्षांनी बदलला जाऊ शकतो, तर मग गटनेता बदलला तर काय झालं? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपला विचारला.

छगन भुजबळ बोलताना....

छगन भुजबळ शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पोहचले होते. त्यावेळी त्यांनी भाजपला हा सवाल केला. दरम्यान, पवार आणि भुजबळ यांच्यात २० मिनिटे चर्चा झाली. मात्र, चर्चा नेमकी कोणत्या विषयावर झाली याची माहिती मिळू शकली नाही.

राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करण्याचा निर्णय बेकायदा असल्याचे सांगत, याविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाने निकाल देताना २७ नोव्हेंबरपर्यंत भापजला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

Last Updated : Nov 26, 2019, 12:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details