महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Fadnavis Reaction On Uddhav Thackeray: ज्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात तेच सावरकरांचे नाव पुसायला निघाले - देवेंद्र फडणवीस

कर्नाटकमध्ये काँग्रेसने एक हाती सत्ता स्थापन केल्यानंतर कालच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाठ्यपुस्तकातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील धडे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर भाजप नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहेत. कॉंग्रेस नेत्यांनो, लोकांच्या मनातील हेडगेवार, सावरकर तुम्ही काढू शकत नाहीत, असे विधान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ज्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात ते या ठिकाणी सावरकरांचे नाव पुसायला निघाले आहेत, असा हल्लाबोल फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे.

Fadnavis Reaction On Uddhav Thackeray
फडणवीस

By

Published : Jun 16, 2023, 6:16 PM IST

फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई:त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावरून काँग्रेस सोबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, तुम्ही पुस्तकातून हेडगेवार, सावरकर काढू शकता. परंतु लोकांच्या मनातील हेडगेवार, सावरकर तुम्ही काढू शकत नाहीत. त्याचबरोबर एकही स्वातंत्र्य संग्राम सेनानी लोकांच्या मनामधून तुम्ही काढू शकणार नाहीत. परंतु काँग्रेसचे सरकार आल्यानंतर यापेक्षा वेगळे असे काही अपेक्षित नाही.

फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल:केवळ अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करण्याकरता ज्या प्रकारचे निर्णय कर्नाटक सरकार घेत आहे. माझा महाविकास आघाडी सरकारला सवाल आहे, तुम्ही म्हणता महाराष्ट्रात 'कर्नाटक पॅटर्न' आणणार तो हाच तुमचा कर्नाटक पॅटर्न आहे का? आणि माझा सवाल आता उद्धव ठाकरे यांना हा आहे की, आता तुम्ही तुमची प्रतिक्रिया सांगा. ज्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात ते या ठिकाणी सावरकरांचे नाव पुसायला निघाले आहेत. धर्मांतराला समर्थन द्यायला निघाले आहेत. तर आता तुमचे नेमके मत काय आहे हे तुम्ही सांगितले पाहिजे. सत्तेकरिता तुम्ही हा समझोता केला, हे यातून स्पष्ट होत आहे. पण मला असे वाटते की, असे निर्णय घेतल्याने कोणाचेही नाव जनतेच्या मानस पटलावरून ते पुसू शकणार नाहीत, असेही फडणवीस म्हणाले.


काय आहे प्रकरण?कर्नाटकमध्ये यंदा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश संपादन करत एकहाती सत्ता स्थापन केली. यानंतर मागील भाजप सरकारने घेतलेले काही वादग्रस्त निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. भाजपने त्याच्या कार्यकाळात कर्नाटकमध्ये हिंदुत्वाच्या दृष्टीने काही धोरणे राबवली होती. ती धोरणे मागे घेण्याचा निर्णय काँग्रेस सरकारने घेतला असून यामध्ये वादग्रस्त धर्मांतर विरोधी कायद्याचासुद्धा समावेश आहे. त्याचबरोबर राज्यातील शाळांमध्ये इयता सहावी ते दहावीच्या कन्नड आणि समाजशास्त्र विषयांच्या पाठ्यपुस्तकांची फेर तपासणी केली जाईल. याअंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील धडे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे सावित्रीबाई फुले, पंडित नेहरूंनी इंदिरा गांधी यांना लिहिलेली पत्रे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील कवितांचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश केला जाणार आहे.

हेही वाचा:

  1. Threats Political Leaders : राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचे प्रमाण वाढले
  2. Bawankules On Congress : काँग्रेसला मत देणे म्हणजे देशात अराजकता निर्माण करणे, बावनकुळे यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
  3. Manipur Violence : मणिपूरमधील समस्या धार्मिक नाही, दंगल गैरसमजातून झाली - केंद्रीय मंत्री राजकुमार रंजन सिंह

ABOUT THE AUTHOR

...view details