नालासोपारा :- नालासोपारा पश्चिमेकडील नालासोपारा रोड खंबलेश्वर मंदिर जवळ, येथील एका भंगाराच्या गोडाऊनला सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली असून भीषण आग लागली असून या आगीत सर्व भंगार सामान जळून खाक झाले आहे. घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आता पर्यंत 6 गाड्या बंब आले असून अद्याप आग आटोक्यात आली नाही,
Marathi Breaking Live : नालासोपाराच्या भंगार गोडाऊनला भीषण आग - महाराष्ट्र लाईव्ह अपडेट्स
23:03 December 18
नालासोपाराच्या भंगार गोडाऊनला भीषण आग
20:09 December 18
दोन्हीही मोर्चे महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारे, संजय राऊत यांचे दुसरे ट्विट
मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी यांच्या हल्लाबोल महामोर्चाला नॅनो मोर्चा म्हणून हिणवलं. त्यानंतर संजय राऊत यांनी जे जे उड्डाणपूल वरून निघालेल्या मोर्चाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेला व्हिडिओ मुंबईत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचा म्हटलं जातंय. यावरून आता एक नवीन वाद पेटत असताना संजय राऊत यांनी दुसरं ट्विट करून सर्व करण्याचा प्रयत्न केला आहे. "मराठा मोर्चा देखील महाराष्ट्र स्वाभिमान.. न्याय्य हक्कांसाठी निघाला. शिवरायांचा जयघोष करीत त्याच मार्गावरून त्याच ताकतीने निघाला.तेव्हा देखील आजच्या प्रमाणे विराट मोर्चाची चेष्टा दबक्या आवाजात हेच लोक करीत होते. दोन्ही मोर्चे महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारे होते. तूर्त इतकेच!" असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
20:06 December 18
महाराष्ट्रात लोकायुक्त लागू करण्याच्या निर्णयाला मान्यता - उपमुख्यमंत्री फडणवीस
आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. लोकपालच्या धर्तीवर महाराष्ट्रात लोकायुक्त लागू करण्याच्या अण्णा हजारे समितीच्या अहवालाला आम्ही मान्यता दिली आहे. या अधिवेशनात विधेयक आणले जाईल: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18:01 December 18
हिवाळी अधिवेशन 2022 : विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, सर्व पातळ्यांवर सरकारला घेणार
नागपूर - राज्यातील अनेक उद्योग दुसऱ्या राज्यात गेले, महापुरुषांचा अवमान अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान यासह अनेक विषयांना घेऊन विरोधक सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करण्याची रणनिती आखत आहे,त्यामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे दिसत आहे, तसे संकेत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी दिले आहेत. हिवाळी अधिवेनापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचं सांगितलं.
17:15 December 18
ठाणे जिल्ह्यातील 42 ग्रामपंचायत दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७१.२४% टक्के मतदान
ठाणे जिल्ह्यातील 42 ग्रामपंचायत दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७१.२४% टक्के मतदान
सात ग्रामपंचायत बिनविरोध तर 35 ग्रामपंचायती साठी सुरू आहे मतदान
कुठे व किती झाले मतदान
कल्याण ग्रामपंचायत
कल्याण मध्ये एकूण नऊ ग्रामपंचायत असून एक बिनविरोध तर आठ ग्रामपंचायत आता परियांत ल 80.99% मतदान झाले
भिवंडी
भिवंडीत एकूण 14 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या सुरू असून एक ग्रामपंचायत बिनविरोध तर 13 ग्रामपंचायती साठी 69.87% मतदान झाले
शहापूर
शहापूर ग्रामपंचायत पाच ग्राम पंचायत असून दोन ग्रामपंचायत बिनविरोध झाला तर तीन ग्रामपंचायत साठी आता आतापर्यंत 56.93% मतदान झाले
मुरबाड
मुरबाड मध्ये 14 ग्रामपंचायत ही असून यात तीन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या तर 11 ग्रामपंचायत साठी सकाळ पासून ७४.४९ टक्के मतदान झाले असल्याची माहिती ठाणे जिल्हा निवडणूक आयोगाने दिले आहे
17:07 December 18
घाटकोपर आग - दोघांची प्रकृती गंभीर, ७ जणांना डिस्चार्ज
मुंबई - घाटकोपर स्टेशन जवळ परख हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या विश्वास इमारतीमधील जुनोज पिझा हॉटेलच्या मीटर बॉक्सला काल दुपारी आग लागली होती. या आगीमध्ये एकूण १४ जण जखमी झाले त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. दोघांची प्रकृती गंभीर असून एकाला ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. तर सात जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
17:06 December 18
‘अवतार’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; दोन दिवसांत कमावले १०० कोटी
मुंबई :हॉलिवूड चित्रपट, ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ने, ( Avatar The Way of Water ) रिलीज होण्याआधीच त्याच्या आगाऊ तिकीट विक्रीने ग्लोबल बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण केले होते. तब्बल १३ वर्षांच्या समर्पित निर्मितीसह, जेम्स कॅमेरूनने मंत्रमुग्ध करणार्या जादुई दुनियेत सर्वांना मग्न केले. या उत्सवाच्या हंगामात हा चित्रपट प्रेक्षकांची प्रथम क्रमांकाची पसंती झाला आहे.
15:13 December 18
डोईफोडवाडी गावात ग्रामपंचायत मतदानावरून वाद; दोन गटात तुफान राडा
बीडतालुक्यातील डोईफोडवाडी गावात ग्रामपंचायत मतदानावरून वाद दोन गटात तुफान राडा झाला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. बोगस मतदान करण्याच्या आरोपावरून दोन गट आमानेसामने आले होते. उप विभागीय पोलीस अधिकारी पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मतदान करण्यावरून दोन गट आमने-सामने आले होते. पोलिसांनी वेळीच आवरल्याने सध्या गावात शांततेचे वातावरण आहे, अशी माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी दिली.
13:30 December 18
केंद्र सरकारचे प्राधान्यक्रम बदलले, तेव्हा त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले- पंतप्रधान नरेंद्र मोदी
जेव्हा आपण केंद्र सरकारचे प्राधान्यक्रम बदलले, तेव्हा त्याचे सकारात्मक परिणाम देशभर दिसून येत आहेत. यावर्षी केंद्र फक्त पायाभूत सुविधांसाठी ७ लाख कोटी रुपये खर्च करत आहे. 8 वर्षांपूर्वी, हे 2 लाख कोटी रुपयांपेक्षाही कमी होते. स्वातंत्र्याच्या 7 दशकांनंतर, आम्ही फक्त 2 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
12:25 December 18
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुंबईत दाखल
भारतीय नौदलात P15B स्टेल्थ-मार्गदर्शित क्षेपणास्त्र नाशक मुरमुगावच्या कमिशनिंग समारंभासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुंबईत आले.
11:50 December 18
अभिनेत्री उर्फी जावेद हिला जीवे मारण्याच्या आणि बलात्काराची धमकी
अभिनेत्री आणि सोशल मीडियावर चर्चेत असणारी अभिनेत्री उर्फी जावेद हिला जीवे मारण्याच्या आणि बलात्काराची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात नवीन गिरी नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
10:50 December 18
पत्नीची हत्या करून केले १२ तुकडे, आरोपीला अटक
साहिबगंजमध्ये आदिवासी समाजातील २२ वर्षीय महिलेच्या शरीराचे १२ भाग सापडले. शरीराचे काही भाग अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. तिचा पती दिलदार अन्सारी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, मृत ही त्याची दुसरी पत्नी होती.
10:02 December 18
देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ची अवहेलना करू नये-संजय राऊत
फडणवीसांची बुद्धी प्रगल्भ आहे. मोर्चाला नॅनो म्हणणे चुकीचे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ची अवहेलना करू नये, असा टोला खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
09:48 December 18
काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेला आज राजस्थानमधून पुन्हा सुरुवात
काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा आज सकाळी राजस्थानमधील कालाखो, दौसा येथून पुन्हा सुरू झाली. यात्रेत सहभागी झालेले काही तरुण 'सचिन पायलट जिंदाबाद' आणि 'हमारा सीएम कैसा हो?' अशा घोषणा देताना दिसले. सचिन पायलट जैसा हो.'
09:36 December 18
गेवराई व बीड तालुक्यातील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद!
बीड : गेवराई तालुक्यातील व बीड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे आज मतदान पार पडत आहे. प्रशासनाकडून याची जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली होती. मात्र आज सकाळी 7.30 वाजेपासून सुरु झालेल्या मतदानावेळी , गेवराई तालुक्यातील धोंडराई, येथील बुथ क्रमांक ५ व बुथ क्रमांक २ येथील ईव्हिएम मशीन बंद पडल्याचे पाहायला मिळाले. मतदानाचा हक्क बजावलेल्या आंबील वडगाव मतदान केंद्र बॅलेट मशीन तांत्रिक कारणामुळे बंद पडली होती. ती मशीन तब्बल दीड तासानंतर सुरू झाली.
08:46 December 18
मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यातील मतदानाला उत्साहात सुरुवात
मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायती पैकी ६ बिनविरोध झाल्याने उर्वरित ३६ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे, सकाळपासूनच जिल्ह्यातील ग्रामीण भागात बहुतांश मतदान केंद्रावर मतदारांनी आपल्या पसंदीता उमेदवाराच्या पारड्यात मताचे दान टाकण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला
ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचात निवडणुकीत भिवंडी तालुक्यात १४ , मुरबाड तालुक्यात १४ तर कल्याण तालुक्यातील ९ तसेच शहापूर तालुक्यातील ५ अश्या ४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील मतदान होणार होणार आहेत. यापैकी सर्वाधिक भिवंडी आणि मुरबाड तालुक्यात १४ – १४ ग्रामपंचायत निवडणुका असून भिवंडी ग्रामीण मधून शिंदे गटाचे आमदार तर मुरबाड तालुक्यात भाजपचे आमदार आहे. मात्र या दोन्ही तालुक्यात भाजपाला गटबाजीसह बंडखोरीने ग्रासले आहे.
08:18 December 18
हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड- संभाजीराजे छत्रपती
ऐतिहासिक चित्रपट हवेत. पण, इतिहासाची मोडतोड नको. नवीन पिढीला दाखविणार तेच इतिहास समजणार आहे. हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड झाल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला.
07:36 December 18
ग्रेटर नोएडा महामार्गावर दोन बसचा अपघात, तीन जणांचा मृत्यू
ग्रेटर नोएडा महामार्गावर नॉलेज पार्क अंतर्गत दोन बसमध्ये झालेल्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस कर्मचारी पोहोचले आहेत.
06:40 December 18
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमात महाराष्ट्रापेक्षा जास्त जम्मू आणि काश्मीरमध्ये कारखान्यांना सुरुवात-मनोज सिन्हा
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) योजनेअंतर्गत, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकपेक्षा जम्मू आणि काश्मीरमध्ये अधिक उत्पादन युनिट्सची स्थापना करण्यात आली. जम्मू काश्मीर हे स्टार्ट-अप क्रमवारीत अव्वल राज्यांपैकी एक असल्याचा दावा नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केला.
06:37 December 18
7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून होणार मतदान
आज 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 20 डिसेंबर रोजी लागणार आहे.
06:26 December 18
Breaking News केंद्र सरकारचे प्राधान्यक्रम बदलले, तेव्हा त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले- पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई : मुंबईच्या तुफान गर्दीत प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी असते. प्रत्येकालाच घाई गर्दीत लोकल पकडायचीच असते. त्यामुळे बहुतेक जण दिव्यांगांच्या डब्यात विचार न करता घुसतात. दिव्यांगांना त्यामुळे स्वतःच्याच डब्यामध्ये आरक्षित जागेवर बसायला उभा राहिला त्रास होतो. यासंदर्भात रेल्वे सुरक्षा दराने मोहीम राबवून साडे 16,500 प्रवाशांकडून दंड वसूल केला आहे.