मुंबई - एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे राम-श्यामची जोडी आहे. ते कधीही एकत्र येऊ शकतात, असे ओवैसी म्हणाले आहेत. ते मुंब्रा येथे सभेला संबोधित करत होते.
Breaking News : ठाकरे-शिंदे कधीही एकत्र येऊ शकतात - असदुद्दीन ओवैसी
21:11 February 26
ठाकरे-शिंदे कधीही एकत्र येऊ शकतात - असदुद्दीन ओवैसी
19:34 February 26
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने केली अटक
नवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली आहे.
18:50 February 26
प्रचाराला गेलो म्हणून विरोधकांच्या पोटात दुखत आहे - फडणवीस
देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद
विद्यार्थ्यांची मागणी आम्ही मान्य करुन घेतली
प्रचाराला गेलो म्हणून विरोधकांच्या पोटात दुखत आहे
बाळासाहेबांची घोषणा आम्ही पूर्ण केली
छत्रपती संभाजीनगर, धाराशिवबाबतची अधिसूचना आज किंवा उद्या निघेल
18:38 February 26
अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकहिताचे निर्णय घेणार - मुख्यमंत्री शिंदे
मुंबई - उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या अधिवेशनात लोकहिताचे निर्णय घेणार आहोत. तसेच विधानपरिषदेत लोकायुक्त कायदा मंजूर करणार असल्याचे शिंदे, फडणवीस म्हणाले.
18:20 February 26
वीर सावरकरांना भारतरत्न द्या; संजय राऊतांचे केंद्राला आवाहन
मुंबई - खासदार संजय राऊत यांनी रविवारी केंद्र सरकारला वीर सावरकरांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्याचे आवाहन केले.
17:42 February 26
साताऱ्यातील माण तालुक्याला ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा सौम्य धक्का
सातारा - साताऱ्यातील माण तालुका रविवारी ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हादरला. पळशी-धामणी परिसरात झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू माणपासून ५ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरीक घरातून बाहेर आले. भूकंपामुळे कोणतीही हानी झाली नसल्याचे सुत्रांनी सांगितले.
16:25 February 26
तोतया ईडी अधिकाऱ्यानंतर सेल्स टॅक्स अधिकारी एल टी मार्ग पोलिसांच्या जाळ्यात
मुंबई :गेल्या महिन्यातच धानजी स्ट्रीट येथे तोतया ईडी अधिकाऱ्यांनी छापा टाकून अडीज किलो सोनं आणि १५ लाख रोकड लंपास केली होती. याप्रकरणी गोपनीय माहितीच्या आधारे एल टी मार्ग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 24 तासाच्या आत तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. आता पुन्हा एल टी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत तोतया सेल्स टॅक्स अधिकारी बनून आलेल्या बंटी बबलीने ३२ लाख रुपयांना गंडा घातला होता. या प्रकरणी एल टी पोलिसांनी महिलेसह एका पुरुष आरोपीला अवघ्या ७ तासांत अटक केली आहे. संजयसिंग अजमेरसिंग करचोली, वय ३३ आणि रजिया अजीज शेख, वय ३६ वर्षे अशी अटक आरोपींची नावे आहेत.
15:50 February 26
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक
मुंबई - महाविकास आघाडीने महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पक्षाची आज उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीला अजित पवार, आदित्य ठाकरे, छगन भुजबळ, अंबादास दानवे, जितेंद्र आव्हाड, अनिल परब आदी नेते उपस्थित होते.
15:39 February 26
मीरा भाईंदरमधील भाजप माजी नगरसेविकेची चक्क पतीविरोधातच तक्रार
मीरा भाईंदर - मीरा-भाईंदर शहरातील भाजप पक्षातील एका माजी नगरसेविका यांनी आपल्या पती विरोधात मारहाण व शिवीगाळ प्रकरणी तक्रार दिली आहे. संबंधित पतीविरोधात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
13:33 February 26
मुंबई महापालिका श्रीमंत.. बँकेमध्ये पैसे गुंतवून पैसे कमावण्यासाठी झालेली नाही, जनतेच्या कल्याणासाठी पैसे लावा: फडणवीस
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री:मुंबई सुशोभीकरणची दोन भूमीपूजन झाली आणि तिसरे भूमिपूजन होत आहे. श्रीमंत पालिका आहे.. बँकेमध्ये पैसे गुंतवून पैसे कमावण्यासाठी झालेली नाही. पैसे जनतेच्या कल्याणासाठी लावा.. पावसाळ्यात रस्त्यावरच्या खड्ड्यांची चर्चा.. खड्ड्यांवर सर्वाधिक मिम ही लाजिरवाणी गोष्ट.. एकाच रस्त्यावर खर्च करायचे आणि जनतेला खड्ड्यात टाकायचे ही नीती आम्ही बदलली... रस्ता झाला की ५० वर्षे खड्डे नाहीत अशी कामे करत आहोत. दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबईचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दोन वर्षात इतके काम होते मग २५ वर्षात कामे का झाले नाही हा प्रश्न विचारण्याची गरज झोपडपट्टीतील नागरिकांना चांगले राहणीमान, मुंबई स्वच्छ केली जात आहे.. एस टी पी प्लांट सुरू केले आहे. समुद्र पर्यावरण खराब केले जात होते. आता परदेशा सारखा समुद्र किनारा मुंबईत पाहायला मिळेल कामे आमच्या काळात झाले म्हणतात.. अडीच वर्षात ते दोन वर्षे दरवाजाच्या आत होते.. सहा महिन्यात त्यांनी कामे कशी केली.. तुमच्या काळात काहीच झाले नाही म्हणून आम्हाला करायला लागत आहे कामामुळे त्रास होत आहे.. त्यामुळे मुंबईकरांची माफी मागतो आमचे काम पारदर्शक पद्धतीने सुरू आहे काम केल्या नंतर करून दाखवले हे बोलून दाखवू. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबईत आज ३२० कोटींच्या कामांचे भूमिपूजन करण्यात येत आहे. त्यावेळी ते बोलत होते.
12:37 February 26
निवडणुका जाहीर होणार? महाविकास आघाडीची दुपारी महत्त्वाची बैठक
मुंबई :आगामी महानगरपालिका निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाविकास आघाडीने आज दुपारी महत्त्वाची बैठक आयोजित केली असून, त्यानंतर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषदही होणार आहे.
12:30 February 26
भारत जोडो यात्रेतून खूप काही शिकलो : राहुल गांधी
छत्तीसगड: भारत जोडो यात्रेतून खूप काही शिकलो. अनेकांच्या व्यथा जाणून घेता आल्या. निवडणुकांसाठी एक वर्षाचा काळ बाकी आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले.
10:48 February 26
जम्मू काश्मिरात पुन्हा एकदा काश्मिरी पंडिताची हत्या
पुलवामा (जम्मू आणि काश्मीर):जम्मू काश्मिरात पुन्हा एकदा काश्मिरी पंडिताची हत्या करण्यात आली आहे. सुरक्षा दलाकडून आता सुरक्षा मोहीम राबवण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अचन गावात एका काश्मिरी पंडिताची अज्ञात दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. पोलीस अधिका-यांनी सांगितले की, मारले गेलेले हे बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आज सकाळी अज्ञात अतिरेक्यांनी आचन येथील काशीनाथ पंडित यांचा मुलगा संजय पंडित याच्यावर गोळीबार केला.
जखमीला पुलवामा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसराची नाकेबंदी केली आहे.
10:46 February 26
हसन मुश्रीफ यांच्या विरोधात खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी १६ जणांवर गुन्हा दाखल
हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगेंमधील वाद वाढणार.. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी १६ जणांवर गुन्हा दाखल
10:42 February 26
नारायणपूर: नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात हेड कॉन्स्टेबल शहीद
नारायणपूर (छत्तीसगड):ओरछामध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात हेड कॉन्स्टेबल शहीद.
ओरछामध्ये नक्षलवाद्यांनी केला आयईडी स्फोट.
ज्यात 1 जवान शहीद झाला.
संजय लकडा असे शहीद जवानाचे नाव आहे.
16 व्या बटालियनमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून तैनात होते.
परिसरात वेगाने शोध सुरू आहे.
10:04 February 26
शिवसेनेच्या शिंदे गटात मोठी घडामोड.. मंत्री, आमदारांची तातडीची बैठक.. मुख्यमंत्री काय सांगणार?
मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटात मोठी घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मंत्री, आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. दुपारी दोन वाजता वर्षा निवासस्थानी ही बैठक होईल. मुख्यमंत्री काय सांगणार? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
09:43 February 26
वंदे भारत रेल्वेवर पुन्हा दगडफेक.. रेल्वेच्या काचा फुटल्या
कर्नाटक | म्हैसूर-चेन्नई वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्याच्या दोन खिडक्यांचे काल काही बदमाशांनी ट्रेनवर दगडफेक केल्याने नुकसान झाले. कृष्णराजपुरम - बेंगळुरू कॅन्टोन्मेंट रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली. कोणीही जखमी झाले नाही: दक्षिण पश्चिम रेल्वे
08:57 February 26
दिल्लीत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त.. सीबीआय करणार चौकशी
दिल्ली |दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मद्य धोरण प्रकरणी मनीष सिसोदिया यांची सीबीआय आज चौकशी करणार आहे.
06:54 February 26
अफगाणिस्तानच्या फैजाबादमध्ये ४.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला
काबूल (अफगाणिस्तान): नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार रविवारी पहाटे 02:14 वाजता फैजाबाद, अफगाणिस्तानच्या 273 किमी पूर्व ईशान्येस 4.3 तीव्रतेचा भूकंप झाला आहे.
06:47 February 26
MAHARASHTRA CRIME POLITICAL BREAKING NEWS LIVE UPDATES TODAY
देश, विदेश आणि महाराष्ट्रातील सर्व ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत राहा