कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेवर ईडीचा छापा टाकाला आहे. काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांच्या कागल निवासस्थानी देखील ईडीचा छापा पडला होता. मुख्य शाखेसह कापशी शाखेमध्ये ईडी पथकाकडून तपासणी करण्यात आली होती.
Maharashtra Breaking News : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेवर ईडीचा छापा
13:12 February 01
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेवर ईडीचा छापा
12:31 February 01
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ७० आणि ५२ माळ्याच्या टॉवरला मंजुरी? ठाणेकरांच्या जीविताशी होतोय खेळ
ठाण्याचा झपाट्याने विकास होत असतानाच ठाणे काँक्रीटचे जंगल देखील झालेले आहे. तर दुसरीकडे ठाण्याचा शँघाय करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आता पालिकेच्या शहर विकास विभागाने चक्क ७२ आणि ५२ मजल्याच्या गगनचुंबी इमारतीला परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे सुरक्षेची क्षमता नसताना गगनचुंबी इमारतीला परवानगी दिल्याने ठाणेकरांच्या जीविताशी खेळ करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.
12:30 February 01
वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांच्या उद्घाटनापूर्वी मुंबई परिसरातील घाट भागात होणार चाचणी
मुंबई - मुंबईहून लवकरच सुरू होणार्या दोन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांच्या उद्घाटनापूर्वी अतिरिक्त लोकोमोटिव्ह तैनात न करता शहराच्या बाहेरील डोंगरी घाट विभागात चाचणी घेण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
11:54 February 01
मुकेश अंबानीच अब्जाधीश; गौतम अदानींना टाकले मागे
फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार मुकेश अंबानी यांनी गौतम अदानींना मागे टाकले आहे.
11:30 February 01
पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक-बसचा अपघात; 4 ठार, 15 जखमी
पुणे-सोलापूर महामार्गावर पुणे जिल्ह्यातील यवत गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसने धडक दिल्याने 4 जण ठार, 15 जखमी झाले आहेत. पहाटे ५ वाजता ही घटना घडली.
10:49 February 01
आता कोयता खरेदीसाठी द्यावं लागणार आधार कार्ड, पुणे पोलिसांचा निर्णय
पुणे-गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँग ने दहशत मजावली असून पुणे पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन करून कोयता गँग ची दहशत काय कमी होत नाहीये.विशेष म्हणजे या कोयता गँग मध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश अधिक असल्याचं दिसून येतं आहे.कोयता गँग वर आळा बसावा तसेच शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी आत्ता पुणे पोलिसांनी नवीन युक्ती आखली आहे.आत्ता या पुढे शहरात कुढेही कोयता घ्यायचा असेल तर त्या संबंधित व्यक्तीला आधारकार्ड द्यावं लागणार असल्याचं माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली आहे.
10:35 February 01
वित्तीय तूट भरून काढणे आव्हान - राजीव पवार
मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्यांना फार मोठ्या अपेक्षा असल्या तरी बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा या अर्थसंकल्पातून फार मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. वित्तीय तूट भरून काढणे आव्हान असल्याचे आयएमसीचे राजीव पवार यांनी सांगितले आहे. याप्रसंगी बोलताना राजीव पवार म्हणाले की निवडणुकीच्या अनुषंगाने सादर होणारा हा अर्थसंकल्प नक्कीच आशा दायक असणार यामध्ये काही वाद नाही. परंतु एकंदरीत वित्तीय तूट भरून काढणे हे सुद्धा अर्थमंत्री यांच्या समोर फार मोठे आव्हान असणार आहे. कारण करोनाच्या महामारी मध्ये ज्या पद्धतीने मागील दोन वर्षांमध्ये वित्तीय तूट मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आलेली आहेत. ती पाहता यंदा ही वित्तीय तूट लक्षात ठेवून अर्थसंकल्प सादर करणे हे सुद्धा एक आव्हानात्मक असणार आहे. मागील ८ वर्ष करामध्ये दिलासा दिला गेला नाही आहे. परंतु त्याचा विचार यंदा होण्याची शक्यता वर्तवली जात असून तशी आशा करायला हरकत नाही. असेही पवार म्हणाले.
10:11 February 01
ग्रामविकास अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात; १ लाखांची लाच घेताना बुलढाणा ACB ने रंगेहाथ पकडले
बुलडाणा - विवाह नोंदणीच्या कागदपत्राची माहिती देण्यासाठी ४ लाख रुपये व १ साखरेचं पोतं मागणाऱ्या मोताळा तालुक्यातील बोरखेडी येथील ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला १ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.३१ जानेवारीला हा सापळा रचण्यात आला. रामचंद्र गुलाबराव पवार (५४) ग्रामपंचायत बोराखेडी ता. मोताळा जि. बुलडाणा असे या लाचखोराचे नाव आहे.
09:36 February 01
मोदींनी मुंबईसाठी भरीव आर्थिक तरतूद करावी- संजय राऊत
मोदींनी मुंबईसाठी भरीव आर्थिक तरतूद करावी. केंद्राच्या तिजोरीत सर्वाधिक वाटा मुंबईचा असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. अपूर्ण प्रकल्पांना केंद्र सरकारची गरज आहे.
09:19 February 01
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात उत्साह, 437.32 अंशांनी वधारला निर्देशांक
शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात 437.32 अंशांनी वधारून 59,987.22 वर पोहोचला आहे.
09:02 February 01
केंद्रीय अर्थमंत्री दुपारी ३ वाजता घेणार पत्रकार परिषद
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थसंकल्प 2023 सादर करणार आहेत. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी भाजप सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. दुपारी ३ वाजता केंद्रीय अर्थमंत्री पत्रकार परिषद घेणार आहेत.
08:33 February 01
सर्वसामान्यांना काय मिळणार हे तुम्हाला सकाळी 11 वाजता कळेल- डॉ भागवत कराड
आज, सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प संसदेसमोर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सादर केला जाईल. त्याआधी, त्यांच्या नेतृत्वाखाली माझे सहकारी पंकज चौधरी आणि सचिव सकाळी ९ वाजता राष्ट्रपतींना भेटतील. सकाळी 10 वाजता, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याचे अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी सांगितले. सर्वसामान्यांना काय मिळणार हे तुम्हाला सकाळी 11 वाजता कळेल. मी या टप्प्यावर कोणतीही टिप्पणी करू इच्छित नाही, असेही अर्थ राज्यमंत्री म्हणाले.
08:32 February 01
अर्थमंत्री निर्मला सीतारामन ११ वाजता सादर करणार अर्थसंकल्प
अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थमंत्रालयातून बाहेर पडल्या आहेत. त्या आज ११ वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
08:27 February 01
अर्थसंकल्प 2023 च्या सादरीकरणापूर्वी वित्त राज्यमंत्री भागवत किशनराव कराड यांनी केली प्रार्थना
मोदी सरकारच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2023 च्या सादरीकरणापूर्वी वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत किशनराव कराड यांनी प्रार्थना केली. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी भाजप सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे
07:26 February 01
मेळघाटात पक्ष्यांच्या २१० प्रजातींची नोंद , सर्वेक्षणातून माहिती समोर
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे दि. २६ ते २९ जानेवारीदरम्यान करण्यात आलेल्या पहिल्या पक्षी सर्वेक्षणात पक्ष्यांच्या २१० प्रजातींची नोंद घेण्यात आली. त्यात मेळघाटात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या यादीत नव्याने १० प्रजातींची भर पडली. महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, प. बंगाल, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ व जम्मू आणि काश्मीर आदी १० राज्यांतील एकूण ६० पक्षी अभ्यासक सर्वेक्षण मोहिमेत सहभागी झाले होते.
07:12 February 01
अजित डोवाल आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची महत्त्वपूर्ण बैठक
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी सध्या सुरू असलेल्या द्विपक्षीय उपक्रमांचा आढावा घेतला आहे. दोघांनी जागतिक आणि प्रादेशिक घडामोडींचे मूल्यमापन केल्याची माहिती अमेरिकेमधील भारतीय दूतावासाने दिली आहे.
07:11 February 01
मथुरा येथील कपड्यांच्या शोरूमला भीषण आग
मथुरा येथील कपड्यांच्या शोरूमला लागलेली भीषण आग आता आटोक्यात आली आहे. इमारतीच्या तीन मजल्यांना आग लागली. अग्निशमन दलाच्या 6-7 गाड्या घटनास्थळी हजर आहेत. आग आटोक्यात आली आहे, आम्ही शेजारच्या इमारतींमध्ये आग पसरू दिली नाही, असे अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितली आहे.
07:10 February 01
बलात्काराचा आरोप असलेल्या संदीप लामिछानेचे निलंबन मागे
क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळने बलात्काराचा आरोप असलेला राष्ट्रीय संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछानेचे निलंबन मागे घेतले आहे.
07:02 February 01
निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार, महाराष्ट्रातील जनतेला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. महाराष्ट्रातील जनतेला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पाकडून सामान्य नागरिकांना बऱ्याच अपेक्षा आहेत.
06:56 February 01
भारतातही नमाज पठण करताना हत्या होत नाही-पाक संरक्षणमंत्री
भारतातही नमाज पठण करताना हत्या होत नाही, अशा शब्दात पाक संरक्षण मंत्र्यांनी निराशा व्यक्त केली आहे. पेशावरमधील मशिदीत बॉम्बस्फोटात किमान ८० नागरिक ठार झाले आहेत.
06:53 February 01
भोपाळमध्ये फसवणूक करणाऱ्या २ आरोपींना मुंबईतून अटक
आम्हाला बनावट कर्ज अॅप्सबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या ज्यांनी लोकांची फसवणूक केली आणि त्यांचे फोटो मॉर्फ करून त्यांच्याकडून पैसे उकळले. मुंबईतील 2 आरोपींना अटक करण्यात आले आहे. हे काम त्यांनी थायलंडमध्ये विकसित केलेल्या चायनीज अॅप्सद्वारे केल्याची माहिती भोपाळ पोलिसांनी दिली.
06:52 February 01
नेपाळहून आलेले २ शालिग्राम दगड गोरखनाथ मंदिरात पोहोचले
नेपाळहून आलेले २ शालिग्राम दगड गोरखपूरच्या गोरखनाथ मंदिरात पोहोचले आहेत. हे शालिग्राम राम मंदिरासाठी अयोध्येला नेले जाणार आहेत. गोरखनाथ मंदिराचे पुजारी म्हणतात, आम्ही खूप आनंदी आहोत. आम्ही पूजा केली आहे. राम आणि देवी सीता यांच्या मूर्ती बनवण्यासाठी त्यांना लवकरच अयोध्येला नेले जाईल, असे गोरखनाथ मंदिराचे पुजारी सांगतात.
06:51 February 01
धनबादमधील मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान निधीकडून २ लाखांची मदत जाहीर
धनबादमधील आगीत मृत झालेल्या प्रत्येकाच्या नातेवाईकांना पंतप्रधान निधीकडून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील, असे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले.
06:19 February 01
Maharashtra Breaking News : मुंबई महापालिकेची भ्रष्टाचाराविरोधात साफसफाई, १३४ कर्मचाऱ्यांचे निलंबन
मुंबई :मुंबई महापालिकेने ५५ कर्मचाऱ्यांना भ्रष्टारातील विविध प्रकरणांवरून बडतर्फ केले आहे. एकूण १३४ कर्मचारी निलंबित करुन महानगरपालिका प्रशासनाने आजवरची सर्वात मोठी कारवाई केली आहे.