महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात ५५२ नवीन कोरोनाग्रस्तांची भर; एकूण रुग्णसंख्या ४ हजार २०० - rajesh tope

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ७२ हजार ०२३ नमुन्यांपैकी ६७ हजार ६७३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४२०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८७ हजार २५४ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६,७४३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

rajesh tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे

By

Published : Apr 19, 2020, 10:54 PM IST

मुंबई - आज (१९ एप्रिल) राज्यात कोरोनाबाधीत ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ४ हजार २०० झाली आहे. १४२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५०७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३४७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७२ हजार ०२३ नमुन्यांपैकी ६७ हजार ६७३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४२०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८७ हजार २५४ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६,७४३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात १२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ६ आणि मालेगाव येथील ४ तर १ मृत्यू सोलापूर मनपा आणि १ मृत्यू जामखेड (अहमदनगर) येथील आहे. त्यात ४ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या १२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६ रुग्ण आहेत तर ५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. मालेगाव येथील मृत्यूमुखी पडलेल्या ४ रुग्णांना इतर काही आजार आहेत का याची माहिती अद्याप अप्राप्त आहे. उर्वरित ८ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये (७५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २२३ झाली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: २७२४ (१३२)

ठाणे: २० (२)

ठाणे मनपा: ११० (२)

नवी मुंबई मनपा: ७२ (३)

कल्याण डोंबवली मनपा: ६९ (२)

उल्हासनगर मनपा: १

भिवंडी निजामपूर मनपा: ५

मीरा भाईंदर मनपा: ७१ (२)

पालघर: १७ (१)

वसई विरार मनपा: ८५ (३)

रायगड: १३

पनवेल मनपा: २७ (१)

ठाणे मंडळ एकूण: ३२१४ (१४८)

नाशिक: ४

नाशिक मनपा: ५

मालेगाव मनपा: ७८ (६)

अहमदनगर: २१ (२)

अहमदनगर मनपा: ८

धुळे: १ (१)

धुळे मनपा: ०

जळगाव: १

जळगाव मनपा: २ (१)

नंदूरबार: १

नाशिक मंडळ एकूण: १२१ (१०)

पुणे: १७ (१)

पुणे मनपा: ५४६ (४९)

पिंपरी चिंचवड मनपा: ४८ (१)

सोलापूर: ०

सोलापूर मनपा: १५ (२)

सातारा: ११ (२)

पुणे मंडळ एकूण: ६३७ (५५)

कोल्हापूर: ३

कोल्हापूर मनपा: ३

सांगली: २६

सांगली मिरज कुपवाड मनपा:१

सिंधुदुर्ग: १

रत्नागिरी: ६ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ४० (१)

औरंगाबाद:०

औरंगाबाद मनपा: ३० (३)

जालना: १

हिंगोली: १

परभणी: ०

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ३३ (३)

लातूर: ८

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ०

नांदेड मनपा: ०

लातूर मंडळ एकूण: १२

अकोला: ७ (१)

अकोला मनपा: ९

अमरावती: ०

अमरावती मनपा: ६ (१)

यवतमाळ: १४

बुलढाणा: २१ (१)

वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: ४८ (३)

नागपूर: २

नागपूर मनपा: ६७ (१)

वर्धा: ०

भंडारा: ०

गोंदिया: १

चंद्रपूर: ०

चंद्रपूर मनपा: २

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: ७२ (१)

इतर राज्ये: १३ (२)

एकूण: ४२०० (२२३)

(या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्त्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा, मनपांनी उपलब्धकरून दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत आहेत तसेच मुंबई मनपा कार्यक्षेत्रामध्ये दिनांक १२ एप्रिल २०२० पासूनच्या नवीन निदान झालेल्या रुग्णांचा समावेश आहे.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ३६८ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ६३५९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २३.९७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details