महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र कोरोना अपडेट : राज्यात ३ हजार ७९१ नवीन रुग्णांचे निदान; ४६ रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज १० हजार ७६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण १५ लाख ८८ हजार ०९१ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.९६ टक्के एवढे झाले आहे.

maharashtra corona update today
महाराष्ट्र कोरोना अपडेट : राज्यात ३ हजार ७९१ नवीन रुग्णांचे निदान; ४६ रुग्णांचा मृत्यू

By

Published : Nov 10, 2020, 8:00 PM IST

मुंबई - राज्यात आज १० हजार ७६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण १५ लाख ८८ हजार ०९१ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.९६ टक्के एवढे झाले आहे. तर, आज राज्यात ३ हजार ७९१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ४६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४५ हजार ४३५ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९५ लाख ३६ हजार १८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख २६ हजार ९२६ (१८.११ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ११ हजार ००४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ६ हजार ९८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात एकूण ९२ हजार ४६१ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कधी किती रुग्ण आढळले?
राज्यात जून दरम्यान दिवसाला ५ हजार ४०० रुग्ण आढळत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे.

राज्यात १२ ऑक्टोबरला ७ हजार ८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८ हजार ५२२ रुग्ण आढळले होते. त्यानंतर १९ ऑक्टोबरला ५ हजार ९८४ रुग्णांची तर, २६ ऑक्टोबरला ३ हजार ६४५ सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. ७ नोव्हेंबरला ३ हजार ९५९ त्यानंतर आज ३ हजार ७९१ इतके रुग्ण आढळले आहेत.

हेही वाचा -अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या सातपैकी सहा संपत्तींचा लिलाव पूर्ण

हेही वाचा -यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच; ७ डिसेंबरपासून सुरू होणार अधिवेशन

ABOUT THE AUTHOR

...view details