मुंबई -आज (शुक्रवारी) राज्यात ५,९६५ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८,१४,५१५ वर पोहचला आहे. तसेच ७५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४६,९८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर २.५९ टक्के एवढा आहे. याबरोबरच राज्यात आज एकूण ८९,९०५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
८९,९०५ अॅक्टिव्ह रुग्ण -
राज्यात आज ३,९३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर एकूण १६,७६,५६४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०७,२२,१९८
प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,१४,५१५ नमुने म्हणजेच १६.९२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,२८,४६२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर ७,११८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.