मुंबई - राज्यात कोरोनाची 48 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. पैकी 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ( Maharashtra Corona Update on 21 January 2022 ) तर 42 हजार 391 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.47 टक्के इतके आहे. ( Corona Positivity Rate in Maharashtra ) सक्रिय रुग्ण मात्र वाढत असून आज दोन लाख 64 हजार रुग्णांची नोंद आहे. तर 144 ओमायक्रोन रुग्णांची नोंद झाल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. ( Maharashtra Heath Department )
राज्यात मागील चार दिवसांपासून दिवसागणिक 40 हजार रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत 69 लाख 67 हजार 432 रुग्ण सापडले आहेत. 48 हजार 270 रुग्णांची यात आज भर पडली आहे. त्यामुळे आजपर्यंतची संख्या 74 लाख 20 हजार 27 इतकी झाली आहे. तर 1 लाख 42 हजार 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात आजच्या 52 मृतांचा समावेश आहे. राज्यातील मृत्यूदर 1.91% एवढा आहे. तर 42 हजार 391 इतके रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आजपर्यंत 70 लाख 9 हजार 823 करोना बाधित बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 94.47% एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 29 लाख 51 हजार 286 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 74 लाख 20 हजार 27 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 23 लाख 87 हजार 593 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3357 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 2 लाख 68 हजार 388 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
ओमायक्रोनचे 144 रुग्ण
राज्यात आज ओमायक्रोनचे 144 नव्या बाधितांची नोंद झाली. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने 80 तर बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने 64 राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळने तपासले आहेत. पुण्यातील 125, सोलापूर 8, पुणे ग्रामीण 6 तर परभणी, जळगाव, मुंबई, रायगड, सातारा आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत 2 हजार 343 एवढे रुग्ण आहेत.