मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट (second wave corona in maharashtra) तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसात 1 ते 2 हजाराच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज शनिवारी 833 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2271 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.67 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे. (maharashtra corona update)
10,249 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 833 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 29 हजार 577 वर पोहचला आहे. तर आज 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 722 वर पोहचला आहे. आज 2271 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 74 हजार 952 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.67 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 45 लाख 94 हजार 210 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.26 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 97 हजार 693 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 10 हजार 249 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. (maharashtra health department)
रुग्णसंख्येत चढ उतार -
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3105, 4 ऑक्टोबरला 2026, 11 ऑक्टोबरला 1736, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149, 25 ऑक्टोबरला 889, 1 नोव्हेंबरला 809, 2 नोव्हेंबरला 1078, 3 नोव्हेंबरला 1193, 4 नोव्हेंबरला 1141, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982, 10 नोव्हेंबरला 1094, 11 नोव्हेंबरला 997, 12 नोव्हेंबरला 925, 13 नोव्हेंबरला 999, 14 नोव्हेंबरला 956, 15 नोव्हेंबरला 686, 16 नोव्हेंबरला 886, 17 नोव्हेंबरला 1003, 18 नोव्हेंबरला 963, 19 नोव्हेंबरला 906, 20 नोव्हेंबरला 833 रुग्ण आढळून आले आहेत.