मुंबई -कोरोना रुग्ण (Corona Cases) संख्येत आज (19 जानेवारी) पुन्हा वाढ झाली आहे. दिवसभरात 43 हजार 697 नवे रुग्ण राज्यभरात आढळून (19 January New Corona Cases) आले आहेत. तर 46 हजार 591 जण बरे होऊन घरी परतले (Discharged Cases) आहेत. राज्यात बुधवारी एकूण 49 रुग्णांचा मृत्यू (Corona Death) झाला आहे. तसेच राज्यात दोन लाख 64 हजार सक्रिय रुग्ण (State Corona Active Cases) आहेत. मंगळवारी ओमायक्रोनचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता, मात्र आज 214 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 158 पुण्यात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येचा आलेख कमी जास्त होताना दिसत आहेत. मंगळवारी 39 हजार 207 इतके रुग्ण आढळून आले होते. बुधवारी 43 हजार 697 रुग्ण सापडले आहेत. तर 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 1.93% एवढा आहे. तर 46 हजार 591 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
- आतापर्यंतची एकूण आकडेवारी -
राज्यात आजपर्यंत एकूण 69 लाख 15 हजार 407 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 94.04% एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 25 लाख 31 हजार 814 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 73 लाख 25 हजार 825 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 23 लाख 93 हजार 704 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3300 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 2 लाख 64 हजार 659 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
- ओमायक्रॉनचा दिलासा -
राज्यात मंगळवारी ओमायक्रोनचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. आज 214 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये पुण्यात 158, मुंबईत 31, पुणे ग्रामीण 10, कल्याण-डोंबिवली मनपा, पिंपरी चिंचवड प्रत्येकी चार, परभणी दोन आणि नाशिक, वसई-विरार, औरंगाबाद, जळगाव आणि इतर राज्यात प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत दोन हजार 74 एवढे रुग्ण झाले आहेत.