सातारा- कराडच्या कृष्णा रुग्णालयातून शुक्रवारी एकूण 6 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये 87 वर्षीय वृद्धासह 3 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. दरम्यान, आज सायंकाळी कराडमधील एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ११५ झाली आहे.
MAHA CORONA : राज्यात आज नवीन 1089 कोरोनाबाधितांची भर, एकूण रुग्णांचा आकडा 19 हजार 63
20:45 May 08
सोलापुरात 14 कोरोनाबाधितांची भर, एकूण रुग्णांचा आकडा 196
20:45 May 08
औरंगाबादमध्ये आज 99 कोरोनाग्रस्तांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या 477
20:45 May 08
राज्यात आज नवीन 1089 कोरोनाबाधितांची भर, एकूण रुग्णांचा आकडा 19 हजार 63
19:52 May 08
धारावीमध्ये आज 25 कोरोनाबाधितांची भर, एकूण रुग्णांचा आकडा 808 वर
19:46 May 08
दिलासादायक..! साताऱ्यातील 6 जण कोरोनामुक्त, बाधितांची संख्या 115 वर
17:15 May 08
औरंगाबादमध्ये नवीन 90 कोरोनाग्रस्तांची भर, एकूण रुग्णांचा आकडा 468 वर
17:14 May 08
जळगावात पुन्हा 10 कोरोना पॉझिटिव्ह आढळले, एकूण रुग्णांचा आकडा 124 वर
16:46 May 08
नाशकात कोरोनाचा आलेख वाढता, एका दिवसात ३८ कोरोनाबाधितांची भर
नाशिक -जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख चढता असल्याचे दिसून येत आहे. नाशकात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून शुक्रवारी नाशिक जिल्ह्यात 38 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंता वाढली आहे.
12:15 May 08
औरंगाबाद एसआरपीएफ कॅम्पमधील 72 जवानांना कोरोनाची लागण
औरंगाबाद- कोरोनाचा संसर्ग आता वेगाने वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे, यात पोलीस विभाग देखील मागे नाही. मालेगाव येथील बंदोबस्तासाठी औरंगाबादमधून गेलेले 'भारत बटालियन'चे जवान शहरात परतले आहेत. यामधील तब्बल 72 जवान कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.
12:13 May 08
दिलासादायक! कोल्हापुरातील आणखीन 4 रुग्णांना डिस्चार्ज; आता फक्त 4 रुग्ण
कोल्हापूर - कोल्हापूरकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी गुरुवारी सायंकाळी सीपीआरमधून मिळाली आहे. कोरोनावर उपचार घेत असलेल्या 4 रुग्णांना सायंकाळी सीपीआरमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. चारही रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना कोरोनामुक्त घोषित करण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
10:34 May 08
जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 114, 16 रूग्णांचा मृत्यू
जळगाव- जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 114 इतकी झाली आहे. पैकी 16 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
09:33 May 08
मुंबईत नवीन 692 कोरोनाग्रस्तांची नोंद, एकूण रुग्णसंख्या 11 हजारांच्या वर
मुंबई- दिवसेंदिवस मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. गुरुवारी नवीन 692 रुग्णांचे नोंद झाली. त्यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 11 हजार 219 वर पोहोचला आहे. तर मुंबईत कोरोनामुळे आज 25 जणांचा मृत्यू झाला असल्याने मृतांचा एकूण आकडा 437 वर पोहोचला आहे.
09:32 May 08
साताऱ्यात एकाच दिवसात 22 कोरोनाबाधितांची नोंद, 8 दिवसांत आकडा अडीचपट
सातारा - जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवसांत 22 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये साताऱ्यासह कराड शहराच्या मध्यवर्ती भागात रुग्णा सापडल्याने खळबळ उडाली आहे. कराडमध्ये 15 रुग्ण, तर हॉटस्पॉट ठरलेल्या मलकापुरात 5 तर वनवासमाचीत येथे 2 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 8 दिवसांत वाढून 114 वर पोहोचला आहे.
09:25 May 08
राज्यात आज नवीन 1089 कोरोनाबाधितांची भर, एकूण रुग्णांचा आकडा 19 हजार 63
मुंबई- संपूर्ण जगाला ग्रासलेल्या कोरोनाने भारतासह महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 17 हजार 974 झाली आहे. गुरुवारी नवीन 1 हजार 216 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तर 207 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत राज्यभरात 3 हजार 301 रुग्ण बरे झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.