मुंबई -आज दिवसभरात राज्यात १६ हजार ३६९ रूग्ण करोनातून बरे झाले, तर १० हजार ९८९ नवीन करोनाबाधित आढळून आले. याशिवाय, २६१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे.
#MAHACORONA LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..
22:08 June 09
राज्यात आज १० हजार ९८९ नवे कोरोनाबाधित, २६१ रुग्णांचा मृत्यू
22:05 June 09
मुंबईत कोरोनाचे 788 नवे रुग्ण, 27 रुग्णांचा मृत्यू, रुग्ण दुप्पटीचा कालावधी 553 दिवस
मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज 788 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज 27 रुग्णांचा मृत्यू झाला तर 511 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी 553 दिवसांवर पोहचला आहे.
22:04 June 09
खोपोलीत विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट
रायगड -खोपोली शहरात कोरोनाबाधितांचा आकडा एक आकडी आला असला तरी जिल्ह्यातील परिस्थिती पाहता पुन्हा संक्रमण पसरू नये यासाठी खोपोली पोलीस आणि खोपोली नगरपालिका प्रशासन यांनी बुधवारी सकाळी विनाकारण फिरणारे तसेच बाजारहाटीसाठी आलेल्यांची पोलिस ठाण्याच्या समोरच कोरोना टेस्ट केली. प्रशासनाने २४ जणांची अँटीजेन चाचणी केली असता यामध्ये सुदैवाने एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.
14:46 June 09
कोल्हापुरातल्या माणगावमध्ये उभारलं लहान मुलांचे पहिले कोविड सेंटर
कोल्हापूर -जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आजही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शिवाय तिसऱ्या लाटेच्या सुद्धा भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सुद्धा सर्वांनाच सज्ज राहण्याचे आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरातल्या हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीने जिल्ह्यातील पहिले लहान मुलांचे कोविड सेंटर सुरू केले आहे. या कोविड सेंटरमधील सर्वच भिंतींवर विविध कार्टूनचे पोस्टर्स लावण्यात आली आहेत.
11:59 June 09
देशातील कोरोनाची आकडेवारी -
एकूण रुग्णसंख्या - 2,90,89,069
एकूण बरे झालेले रुग्ण - 2,75,04,126
एकूण मृत्यू - 3,53,528
सक्रिय रुग्णसंख्या - 12,31,415
एकूण लसीकरण - 23,90,58,360
11:58 June 09
देशात मागील 24 तासांत 92,596 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आहे. तर 1,62,664 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. यासोबतच 2219 बाधितांचा मृत्यू झाला, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
10:58 June 09
नागपूर -गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आलेल्या पहिल्या लाटेपासूनच्या दहा महिन्यात नागपूर शहरात शंभर पेक्षा कमी कोरोना बाधित फक्त तीन वेळा आढळले.
- 25 जानेवारी 2021ला 99 रुग्ण
- 15 नोव्हेंबर 2020 ला 48 रुग्ण
- 8 जून 2021 ला 46 रुग्ण
10:57 June 09
नागपूर शहरात कोरोना दहा महिन्याच्या निच्चांकी पातळीवर
रुग्ण बरे होण्याच दर १ टक्क्यांच्या खाली जाऊन ०.८४ टक्के इतका कमी झाला आहे.
09:05 June 09
कोरोना संदर्भातील विविध समस्या संदर्भातील याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. राज्य सरकारच्यावतीने 'काळ्या बुरशी' संदर्भात राज्यातील परिस्थितीचा अहवाल न्यायालयात सादर केला गेला. म्यूकरमायकोसिसवरील औषध 'अॅम्पोटेरेसिन-बी' चे 91 हजार 470 डोस आजवर महाराष्ट्रात देण्यात आले, अशी आकडेवारी केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सादर केली.
06:09 June 09
राज्यात आज १० हजार ९८९ नवीन करोनाबाधित
मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार. मंगळवारी राज्यात 10 हजार 891 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 58 लाख 52 हजार 891 इतकी झाली आहे. असे असले तरी राज्यात मंगळवारी 16 हजार 577 इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या 55 लाख 80 हजार 925 इतकी झाली आहे. एका बाजूला कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी कोरोनामुळे मृत होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात 24 तासांत 295 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.