आंबेगाव (पुणे)करोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात अनेकांचे कुटुंब उद्वस्त केले आहे. सध्या परिस्थिती आटोक्यात आली असली तरीही धोका अजून टळला नाही. या महासाथीने अनेकांचे नातलग हिरावले. एकाच कुटुंबातील दोन-तीन व्यक्तींचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाला आहे.अशा अनेक घटना राज्यात घडल्या आहेत. आंबेगाव तालुक्यातील चोंडोली बुद्रुक येथेही अशीच एक हृदयद्रावक घटना घडली. कोरोना संसर्गाने बाप व लेकाचा काही तासाच्या फरकाने मृत्यू झाला आहे. घरातील दोन्हीही कर्ते पुरूष गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळा आहे.