महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

#MAHACORONA LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

ज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स
ज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स

By

Published : Jun 4, 2021, 7:11 AM IST

Updated : Jun 4, 2021, 12:38 PM IST

12:37 June 04

24 तासात 342 कोरोनामुक्त;177 पॉझिटिव्ह तर 5 मृत्यू

चंद्रपूर - गत 24 तासात जिल्ह्यात 342 रूग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली, तर 177 रूग्ण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 5 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. आज एकूण 2723 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 177 पॉझिटिव्ह तर 2546 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. बाधित आलेल्या 177 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 54, चंद्रपूर तालुका 21, बल्लारपूर 28, भद्रावती 27, ब्रम्हपुरी 3, नागभिड 0, सिंदेवाही 0, मूल 9, सावली 1, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 4, राजूरा 8, चिमूर 2, वरोरा 5, कोरपना 6, जिवती 5 व इतर ठिकाणच्या 3 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील 43 वर्षीय महिला, भद्रावती तालुक्यातील नेताजी नगर येथील 57 वर्षीय पुरुष, राजुरा तालुक्यातील 40 वर्षीय महिला, ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील 59 वर्षीय पुरुष तर वणी-यवतमाळ येथील 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
 


 

12:30 June 04

कोरोनाचे मृत्यू तांडव; टेभूर्णीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा घेतला बळी

भूर्णीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा कोरोनाने घेतला बळी

माढा (सोलापूर) - माढा तालुक्यात कोरोनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या आकडेवारीतही मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. त्याचप्रमाणे या कोरोनामुळे टेभूर्णी गावातील भैय्या शेख यांच्या ७ सदस्यांच्या कुटुंबातील तब्बल ५ सदस्यांचा अवघ्या १० दिवसात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे माढा तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच कोरोनाच्या या मृत्यूतांडवामुळे प्रशासनाचा ढिसाळपणाही उघडा पडत आहे.

07:35 June 04

मुंबईत आज लसीकरण सुरू; बाहेरील लाभार्थ्यांना आळा घालण्याचा प्रयत्न

मुंबईत आज लसीकरण सुरू

मुंबई - कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी लसीकरण सुरू आहे. लसीचा तुटवडा जाणवत असल्याने गुरुवारी लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. मात्र, आता लसीचा साठा उपलब्ध झाल्याने शुक्रवारी लसीकरण सुरू राहील. तसेच मुंबई बाहेरील लाभार्थ्यांना आळा घालून मुंबईकरांना लस दिली जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी दिली.
 

06:59 June 04

राज्यसरकारमध्ये निर्बंध हटवण्यावरुन संभ्रमावस्था

राज्यसरकारमध्ये निर्बंध हटवण्यावरुन संभ्रमावस्था

मुंबई -राज्यात पाच स्तरांमध्ये 'अनलॉक' करण्यात येणार आहे. तसेच ज्या 18 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी दर 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केले जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत केली होती. मात्र, त्यानंतर काहीच वेळात राज्याच्या जनसंपर्क व माहिती कार्यालयाने अनलॉकबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. यामुळे राज्य सरकारमध्येच संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.


 

06:11 June 04

राज्यात कोरोनानंतर म्युकरमायकोसिसचे थैमान

राज्यात कोरोनानंतर म्युकरमायकोसिसचे थैमान

सातारा - जिल्ह्यात म्युकरमायकोसिसमुळे गेल्या दोन दिवसांत ३ बळी गेले. त्यामुळे या आजाराने बळींची संख्या आता 11 झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात 14 वर्षांखालील सुमारे 2 हजार 300 कोरोना बाधित बालकांवर उपचार सुरू असल्याची माहिती शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

Last Updated : Jun 4, 2021, 12:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details