मुंबई :गेल्या तीन वर्षाचा अनुभव पाहता पुन्हा कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्याने पालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. ९ वर्षाखालील २३ हजार ८३६, १० ते १९ वयातील ६१ हजार ८७५, २० ते २९ वयातील १ लाख ९० हजार ३४६, ३० ते ३९ वयातील २ लाख ३३ हजार १०७, ४० ते ४९ वयातील १ लाख ९४ हजार ९३८, ५० ते ५९ वयातील १ लाख ८० हजार ७५८, ६० ते ६९ वयातील १ लाख ३२ हजार ६६५, ७० ते ७९ वयातील ७७ हजार ५६६, ८० ते ८९ वयातील २८ हजार ८६८ तसेच ९० वर्षावरील ४ हजार ५५६ रुग्ण नोंद झाले आहेत.
'या' वयातील रुग्णांचे सर्वाधिक मृत्यू :९ वर्षाखालील ३१, १० ते १९ वयातील ६७, २० ते २९ वयातील २३९, ३० ते ३९ वयातील ६८१, ४० ते ४९ वयातील १७७३, ५० ते ५९ वयातील ३९५६, ६० ते ६९ वयातील ५३०२, ७० ते ७९ वयातील ४८०६, ८० ते ८९ वयातील २४७८ तसेच ९० वर्षावरील ३७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये एकूण १९ हजार ७४९ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी ५० वर्षांवरील १६ हजार ९२० मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत १.७० टक्के इतका मृत्यू दर आहे.