मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक, सांगली या सहा जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. तर चार आठवड्यापूर्वी असलेल्या पॉजीटिव्हीटी रेटमध्ये सहा पटीने वाढ झाली आहे. पनवेल पालिका येथे १ आणि कोल्हापूर येथे २ अशा एकूण ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी ३१७ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ८१ लाख ४२ हजार ९९२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७९ लाख ९२ हजार ०४५ रुग्ण बरे झालेले आहेत. १ लाख ४८ हजार ४४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सहा जिल्ह्यातील पॉजीटिव्हीटी रेट अधिक :राज्यात चार आठवड्यापूर्वी १.०५ इतका पॉजीटिव्हीटी रेट होता. त्यात आता सहा पटीने वाढ झाली आहे. २२ ते २८ मार्च दरम्यान ६.१५ टक्के इतका
पॉजीटिव्हीटी रेट झाला आहे. सोलापूरमध्ये २०.०५ टक्के, सांगली १७.४७ टक्के, पुणे १२.३३ टक्के, कोल्हापूर १५.३५ टक्के, नाशिक ७.८४ टक्के, अहमदनगर ७.५६ टक्के इतका पॉजीटिव्हीटी रेट आहे.
राज्यात एकून ऑक्सीजन प्लांट ५२३ यात ५५२ एमटी ऑक्सीजन निर्मिती करु शकतात. तसेच एकून ३७० लिक्वीड ऑक्सीजन टॅक आहेत. जंबो सिलेंडर - ५६५५१, छोटे सिलेंडर - २०,००० आणि डयुरा सिलेंडर १००० उपलब्ध आहेत.