मुंबई -राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येचा आज पुन्हा वाढ झाली आहे. काल (सोमवारी) रुग्णांची संख्या 6 हजारांच्या घरात होती तर आज (मंगळवारी) त्यात वाढ होऊन ती 7 हजारावर गेली. राज्यात आज 7 हजार 863 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती -
राज्यात 24 तासांत सहा हजार 332 कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 20 लाख 36 हजार 790 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93. 89% झाले आहे. राज्यात नव्या सात हजार 863 रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या 21 लाख 69 हजार 330 इतकी झाली. तर राज्यात 24 तासात 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्युदर 2. 41 टक्के इतका आहे. तर राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 79 हजार 93वर पोहोचली.