मुंबई - राज्यात आज (शुक्रवारी) ५,६४० नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १७,६८,६९५ वर पोहचला आहे. तसेच आज १५५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४६,५११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के इतका आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
७८,२७२ अॅक्टिव्ह रुग्ण -
राज्यात आज ६,९४५ रुग्ण बरे होऊन घरी आहे. आजपर्यंत एकूण १६,४२,९१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८९ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज १५५ कोरोना बाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण १५५ मृत्यूंपैकी ५१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३ मृत्यू हे आठवड्यातील तर ९१ मृत्यू हे एक आठवड्यापुर्वीचे आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३५ हजार ६६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,६८,६९५ नमुने म्हणजेच १७.६२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५,५८,०९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये तर ४,८८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण ७८,२७२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.